"मी कमी शिकलेलो असतो तर, इंडस्ट्रीत टिकलो नसतो", प्रियदर्शन यांच्या 'त्या' विधानावर राजपाल यादवचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 09:02 IST2026-03-02T09:01:07+5:302026-03-02T09:02:41+5:30

"मी सुशिक्षित...", प्रियदर्शन यांनी शिक्षणाबद्दल केलेल्या वक्तव्यावर राजपाल यादव स्पष्टच बोलला 

rajpal yadav reaction on priyadarshans poor education remark says he doesnt know me | "मी कमी शिकलेलो असतो तर, इंडस्ट्रीत टिकलो नसतो", प्रियदर्शन यांच्या 'त्या' विधानावर राजपाल यादवचं उत्तर

"मी कमी शिकलेलो असतो तर, इंडस्ट्रीत टिकलो नसतो", प्रियदर्शन यांच्या 'त्या' विधानावर राजपाल यादवचं उत्तर

Rajpal Yadav: हिंदी सिनेसृष्टीत असे काही कलाकार आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाने स्वतःचं स्थान निर्माण तर केलंच शिवाय प्रेक्षकांच्या मनातही जागा मिळवली. त्यातील एक नाव म्हणजे अभिनेते राजपाल यादव(Rajpal Yadav). राजपाल यांनी त्यांच्या कॉमेडीने प्रेक्षकांना मनसोक्त हसवलं.मात्र, मागील काही दिवसांपासून अभिनेता मोठ्या चर्चेत आहे. चेक बाऊन्स प्रकरणात अभिनेत्याला आत्मसमर्पण करावे लागले होते. अलिकडेच काही दिवसांपू्र्वीच त्याला जामीन मिळाला आहे. अशातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने बॉलिवूड इंडस्ट्रीतून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.तसेच दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी त्याच्या शिक्षणाबद्दल केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलं.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

दरम्यान, राजपाल यादव तुरुंगात असताना प्रियगदर्श यांनी कमी शिक्षणामुळे त्याच्याकडून चूक झाली असं वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यावर अभिनेत्याने प्रतिक्रिया नाराजी व्यक्त केल्याची पाहायला मिळतेय. नुकताच स्क्रीनसोबत बोलताना अभिनेत्याने म्हटलं,"हे पूर्णपणे चुकीचं आहे. प्रियदर्शनजी मला ओळखतही नाहीत. मी एक सुशिक्षित माणूस आहे. मी वयाच्या ११ व्या वर्षापासून ते आतापर्यंत काम करत आहे. मोठे लोकही कधीकधी अडचणीत येतात, पण त्याचा त्यांच्या शिक्षणाशी काहीही संबंध नाही.जर मी कमी शिक्षित असतो तर मी इंडस्ट्रीत २५-३० वर्षे टिकलोच नसतो."असं म्हणत अभिनेत्याने प्रियदर्शन यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. 

त्यानंतर अभिनेता म्हणाला,"राम गोपाल वर्मा, डेव्हिड धवन आणि प्रियदर्शन या तिन्ही दिग्दर्शकांबद्दल मला खूप आदर आहे. मी या तिघांसोबत ५० हून अधिक चित्रपट केले आहेत. असे का आहे.मी प्रियदर्शन यांना वडिलांसारखे मानतो. परंतु, माझ्या आयु्ष्यात काय चाललंय हे त्यांना फारसं माहित नाही. त्यामुळे त्यांनी अशा मतांना जास्त महत्त्व देत नाही.

प्रियदर्शन काय म्हणालेले?

मिड डेला दिलेल्या मुलाखतीत प्रियदर्शन यांनी राजपाल यादवबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "मी राजपालला पहिल्यांदा जंगल सिनेमात पाहिलं होतं. त्याचा अभिनय पाहून मी इंम्प्रेस झालो होतो. त्याच्यासोबत मी मालामाल विकली हा पहिला सिनेमा केला. त्यानंतर माझ्या प्रत्येक सिनेमात राजपाल होता. माझ्या आगामी सिनेमातही तो दिसणार आहे. मी माझ्या निर्मात्यांना सांगितलं आहे की त्याची सध्याची परिस्थिती लक्षात घेता त्याला थोडं जास्त मानधन द्या. आम्हाला सगळ्यांनाच त्याला यातून बाहेर काढायचं आहे. राजपाल माझ्या सिनेमात व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे". 

"मला त्याच्या या समस्येबद्दल आधीपासूनच माहीत होतं. त्यामुळेच मी माझ्या प्रत्येक सिनेमात त्याला घेत असतो. मी अनेक जाहिरातींमध्येही त्याला काम मिळवून दिलं आहे. कमी शिक्षणामुळे त्याने खूप मोठी चूक केली. तो खूप चांगला माणूस आहे", असंही पुढे ते म्हणाले. राजपाल यादवला सोनू सूद, सलमान खान, मिका सिंग यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. 

Web Title : राजपाल यादव ने प्रियदर्शन के शिक्षा पर दिए बयान का जवाब दिया।

Web Summary : राजपाल यादव ने प्रियदर्शन की टिप्पणी का खंडन किया, जिसमें उनकी कानूनी परेशानी को उनकी शिक्षा से जोड़ा गया था। यादव ने अपने लंबे करियर और शिक्षा पर जोर दिया, प्रियदर्शन के प्रति सम्मान व्यक्त किया लेकिन उनके आकलन से असहमत थे। प्रियदर्शन ने कहा था कि यादव की शिक्षा की कमी के कारण उनसे गलती हुई।

Web Title : Rajpal Yadav responds to Priyadarshan's statement on his education.

Web Summary : Rajpal Yadav refuted Priyadarshan's comment linking his legal trouble to his education. Yadav emphasized his long career and education, expressing respect for Priyadarshan but disagreeing with his assessment. Priyadarshan had stated Yadav's lack of education led to his error.