Rajpal Yadav : अभिनेता राजपाल यादवची विद्यार्थ्याला शिवीगाळ; तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 03:33 PM2022-12-13T15:33:23+5:302022-12-13T15:35:32+5:30

विनोदी अभिनेता राजपाल यादवविरोधात विद्यार्थ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणात तक्रार दाखल झाली आहे.

rajpal-yadav-misbehaves-with-a-boy-during-shoot-in-prayagraj-compaint-filed-against-him | Rajpal Yadav : अभिनेता राजपाल यादवची विद्यार्थ्याला शिवीगाळ; तक्रार दाखल

Rajpal Yadav : अभिनेता राजपाल यादवची विद्यार्थ्याला शिवीगाळ; तक्रार दाखल

googlenewsNext

Rajpal Yadav : विनोदी अभिनेता राजपाल यादवविरोधात विद्यार्थ्याला शिवीगाळ(Misbehave) केल्याप्रकरणात तक्रार दाखल झाली आहे. प्रयागराज (Prayagraj) येथे चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान राजपाल टु व्हिलर चालवत असताना अपघाताने एका विद्यार्थ्याला धडकला. याविरोधात विद्यार्थ्याने कर्नलगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

बालाजी हा विद्यार्थी विश्वविद्यालयाच्या बॅंकरोड परिसरात पुस्तके विकत घेत होता. तिथेच सिनेमाचे शूट सुरु होते. राजपाल यादव टू व्हिलर चालवत होता. अपघाताने राजपाल यादव विद्यार्थ्याला धडकला. यामुळे त्याला दुखापत झाली मात्र राजपाल यादवच्या क्रू मेंबर्सने शिविगाळ केल्याचा आरोप विद्यार्थ्याने केला आहे. तसेच मारण्याचीही धमकी दिली असल्याचे त्याने तक्रारीत म्हणले आहे. 

तर दुसरीकडे शूटिंग क्रू मेंबर्सनेही विद्यार्थ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. शूटिंगमध्ये अडथळे आणल्याचा आरोप त्याच्यावर केला आहे. बाजुला हो सांगूनही तो मुलगा तिथेच भटकत होता, फोटो काढत होता असा आरोप विद्यार्थ्यावर करण्यात आला आहे.

Web Title: rajpal-yadav-misbehaves-with-a-boy-during-shoot-in-prayagraj-compaint-filed-against-him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.