तुरुंगातून सुटल्यानंतर भाचीच्या लग्नात थिरकताना दिसला राजपाल यादव, सलमानच्या गाण्यावर डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 17:03 IST2026-02-19T17:02:35+5:302026-02-19T17:03:02+5:30

राजपाल यादवचा व्हिडीओ पाहिलात का?

rajpal yadav dance in niece s marriage video viral after coming out of tihar jail | तुरुंगातून सुटल्यानंतर भाचीच्या लग्नात थिरकताना दिसला राजपाल यादव, सलमानच्या गाण्यावर डान्स

तुरुंगातून सुटल्यानंतर भाचीच्या लग्नात थिरकताना दिसला राजपाल यादव, सलमानच्या गाण्यावर डान्स

विनोदी अभिनेता राजपाल यादवची मंगळवारी तिहार जेलमधून सुटका झाली. बाहेर येताच ते थेट आपल्या पुतणीच्या लग्नात सहभागी झाले आहेत. आज गुरुवारी १९ फेब्रुवारी रोजी त्याच्या पुतणीचं लग्न आहे. भाचीच्या लग्नासाठीच त्याने न्यायालयात तातडीने जामिनासाठी विनंती केली होती. तर आता लग्नातील एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये राजपालने सोनेरी रंगाचा धोती-कुर्ता परिधान केला असून, सलमान खानच्या 'तेरी चुनरिया' या गाण्यावर तो आपल्या कुटुंबीयांसह आनंदाने थिरकताना दिसत आहेत.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

व्हिडीओमध्ये राजपाल सोनेरी रंगाच्या धोती-कुर्तामध्ये दिसत आहे. सलमानचं 'हॅलो ब्रदर'मधलं गाणं 'तेरी चुनरिया'वर तो थिरकताना दिसत आहे. त्याच्यासोबत कुटुंबातील इतरही सदस्य आहेत. पुतणीच्या लग्नाचा राजपालच्या चेहर्‍यावर कमालीचा आनंद दिसत आहे.


तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राजपाल यादवने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चाहत्यांचे आभार मानले. तो म्हणालेला की, "मी चित्रपटसृष्टीला विनंती करतो की मला पुन्हा काम द्या. मला काम करण्याची खूप इच्छा आहे. पैशांबाबत बोलायचे झाले तर, तुम्ही तुमच्या मर्जीनुसार मला मानधन द्या, ते मला मान्य असेल. पण कृपया मला रिकामं घरी बसवू नका, मला कामाची गरज आहे."

नक्की प्रकरण काय?

चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादवला अंतरिम जामीन मंजूर केला. तक्रारदार कंपनीच्या बँक खात्यात १.५ कोटी रुपये जमा झाल्याची माहिती मिळाल्यानंतर, न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांच्या खंडपीठाने १८ मार्चपर्यंत त्याच्या सुटकेचे आदेश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १८ मार्च रोजी होणार असून, तोपर्यंत राजपाल यादव कोठडीबाहेर असणार आहे.

Web Title : जेल से छूटने के बाद राजपाल यादव ने भांजी की शादी में किया डांस

Web Summary : तिहाड़ जेल से रिहा होने के बाद, राजपाल यादव अपनी भांजी की शादी में शामिल हुए। एक वीडियो में वह सलमान खान के गाने पर अपने परिवार के साथ खुशी से नाचते हुए दिखाई दे रहे हैं। उन्होंने शादी के लिए जमानत मांगी थी और फिल्म में काम चाहते हैं।

Web Title : Rajpal Yadav Dances at Niece's Wedding After Jail Release

Web Summary : After release from Tihar Jail, Rajpal Yadav attended his niece's wedding. A video shows him dancing joyfully to Salman Khan's song with his family. He had requested bail for the wedding and seeks film work.