‘स्त्री’नंतर राजकुमार राव निभवणार ‘दोस्ताना’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 20:34 IST2018-09-30T20:34:22+5:302018-09-30T20:34:58+5:30
‘दोस्ताना’ तरूण मनसुखानी याने दिग्दर्शित केला होता. ‘दोस्ताना2’कॉलिन डी कुन्हा दिग्दर्शित करणार आहे. या चित्रपटाबद्दल आणखी ताजी बातमी म्हणजे, यावेळी ‘दोस्ताना2’मध्ये एकदम नवी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

‘स्त्री’नंतर राजकुमार राव निभवणार ‘दोस्ताना’!
प्रियांका चोप्रा, अभिषेक बच्चन, जॉन अब्राहमच्या २०१० मध्ये ‘दोस्ताना’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर धूम केली होती. या चित्रपटातील जॉन अब्राहमच्या एका सीनची तर प्रचंड चर्चा झाली होती. बिचवर चित्रित करण्यात आलेल्या जॉनचा हा सीन चित्रपटाइतकाच गाजला होता. करण जोहर दीर्घकाळापासून या चित्रपटाच्या सीक्वल काम करतोय. केवळ कामचं नाही तर आता या चित्रपटाची तयारीही सुरू झाली आहे. म्हणजेच, ‘दोस्ताना2’ येणार हे नक्की आहे. ‘दोस्ताना’ तरूण मनसुखानी याने दिग्दर्शित केला होता. ‘दोस्ताना2’कॉलिन डी कुन्हा दिग्दर्शित करणार आहे. या चित्रपटाबद्दल आणखी ताजी बातमी म्हणजे, यावेळी ‘दोस्ताना2’मध्ये एकदम नवी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. यापैकी एका हिरोची निवड झाली आहे. हा हिरो दुसरा कुणी नसून राजकुमार राव आहे. होय,‘दोस्ताना2’साठी राजकुमारचे नाव फायनल झाले आहे. अर्थात तो कुठली भूमिका साकारणार, याची घोषणा अद्याप बाकी आहे. राजकुमारच्या अपोझिट कोण दिसणार हेही अद्याप गुलदस्त्यात आहे.
राजकुमार रावचा ‘स्त्री’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला. या चित्रपटाने बॉक्सआॅफिसव १३० कोटींपेक्षा अधिकचा बिझनेस केला आहे. आता राजकुमारच्या हाती ‘दोस्ताना2’च्या निमित्ताने आणखी एक मोठा सिनेमा लागला आहे.