"विक्की विद्या का वो वाला वीडियो"; आता हे काय नवीन प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 17:59 IST2023-09-28T17:56:08+5:302023-09-28T17:59:26+5:30

‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ असे अभिनेता राजकुमार रावच्या नव्या चित्रपटाचे नाव आहे.

Rajkummar Rao next film Vicky Vidya Ka Woh Wala Video is masala entertainer | "विक्की विद्या का वो वाला वीडियो"; आता हे काय नवीन प्रकरण?

Rajkummar Rao

बॉलीवूडमधील अनेक चित्रपट आणि वेब सीरिजची चर्चा होत असते. काही चित्रपट आणि वेबसिरीजची नावे तर अगदी भन्नाट असतात. वेगवेगळ्या प्रकारची नावे असलेल्या चित्रपटांमध्ये बॉलिवूडच्या अनेक बड्या कलाकारांनीही काम केले आहे. अशाच एका नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट चाहत्यांच्या पसंतीस पडेल की नाही हे येणार्‍या काळातच कळेल. मात्र, या चित्रपटाच्या नावाचीच सध्या चर्चा सुरू आहे.  ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ असे या नव्या बॉलिवूड चित्रपटाचे नाव आहे.

अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' या कौटुंबिक चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. "विकी विद्या का वो वाला व्हिडिओ" चे पोस्टर राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

'ड्रीम गर्ल' या हिट चित्रपटाचे दिग्दर्शक राज शांडिल्य या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. निर्मात्यांच्या मते हा मसाला चित्रपट असून प्रेक्षकांना ९० च्या दशकात घेऊन जाणार आहे. गुलशन कुमार यांची कंपनी टी-सीरीज, बालाजी टेलिफिल्म्स, वाकाओ फिल्म्स, थिनिंक पिक्चर्सच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. हा चित्रपट आपल्याला ९० च्या दशकातल्या जादुई युगात घेऊन जाईल. 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' अशा अगळ्या-वेगळ्या चित्रपटाच्या नावामुळे या व्हिडीओत नेमकं काय असेल? हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

नुकतेच  राजकुमार रावची 'गन्स अँड गुलाब' ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली.  या चित्रपटातील त्याचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला आहे. 'गन्स अँड गुलाब' मध्ये राजकुमार राव सोबत दुल्कर सलमान, आदर्श गौरव आणि गुलशन देवैया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर तृप्ती डिमरी  रणबीर कपूरच्या बहुचर्चित 'ॲनिमल' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझरही रिलीज झाला आहे.

Web Title: Rajkummar Rao next film Vicky Vidya Ka Woh Wala Video is masala entertainer