राजकुमार राव आणि पत्रलेखा चाहत्यांना देणार गुड न्यूज, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 10:33 IST2025-01-31T10:33:13+5:302025-01-31T10:33:28+5:30
राजकुमार आणि पत्रलेखा यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

राजकुमार राव आणि पत्रलेखा चाहत्यांना देणार गुड न्यूज, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
Rajkummar Rao And Patralekhaa: बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि पत्रलेखा (Patralekhaa) हे सिनेइंडस्ट्रीतल्या लोकप्रिय सेलिब्रिटी कपल पैकी एक आहेत. कपल गोल्स म्हणून दोघांकडं पाहिलं जातं. दोघांच्या लव्हस्टोरीची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते. राजकुमार आणि पत्रलेखा यांनी ११ वर्षांच्या मैत्रीनंतर नोव्हेंबर २०२१ला लग्न केलं होतं. आता दोघांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. चाहत्यांना लवकरच एक आनंदाची बातमी सांगणार असल्याचं या जोडप्यानं म्हटलं आहे.
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या या पोस्टनं चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. अभिनेत्यानं पोस्ट शेअर करत लिहलं, "काहीतरी खूप खास घडणार आहे. हे तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी उत्सुक आहे. आमच्याशी जोडलेले राहा". तर यासोबतच तळटीप देत त्यानं "आम्ही आई-बाबा होणार नाही आहोत", असंही स्पष्ट केलं. त्यामुळे नेमकी कोणती आनंदाची बातमी हे जोडपं शेअर करणार आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते प्रतिक्षेत आहेत.
राजकुमार आणि पत्रलेखा हे दोघं एका प्रोजेक्टवर काम करणार असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. राजकुमार आणि पत्रलेखाला पुन्हा एकदा एकत्र पाहाण्यासाठी चाहत्यांना आतुरता आहे. याआधी ही जोडी 'सिटीलाइट्स'मध्ये एकत्र झळकली होती. पण, त्यानंतर मात्र दोघांनी पुन्हा एकाही प्रोजेक्टमध्ये एकत्र काम केलं नाही.
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अभिनेता अलिकडेच तृप्ती डीमरीसोबत 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. तर त्याआधी तो श्रद्धा कपूरसोबत 'स्त्री २'मध्येही झळकला होता. तर पत्रलेखा ही प्रतीक गांधी याच्यासोबत 'फुले' या हिंदी सिनेमात पाहायला मिळणार आहे. यात ती सावित्रीबाईंची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या १९७ व्या जयंतीनिमित्त चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.