पैदा नही हुए तो क्या, बन तो सकते है! राजकुमारचा कधीही न पाहिलेला अवतार, 'मालिक' चा टीझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 15:13 IST2025-06-03T15:12:21+5:302025-06-03T15:13:19+5:30

खांद्यावर बंदुक, हातात फावडा, अंगावर रक्त अन्... राजकुमारच्या 'मालिक'चा धाँसू टीझर

rajkumar rao starrer malik teaser out actor in never seen action look | पैदा नही हुए तो क्या, बन तो सकते है! राजकुमारचा कधीही न पाहिलेला अवतार, 'मालिक' चा टीझर रिलीज

पैदा नही हुए तो क्या, बन तो सकते है! राजकुमारचा कधीही न पाहिलेला अवतार, 'मालिक' चा टीझर रिलीज

'बरेली की बर्फी' असो किंवा नुकताच आलेला 'भूल चूक माफ' असो अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) अनेकदा विनोदी भूमिकांमध्येच दिसला आहे.  मात्र आता तो पहिल्यांदाच जबरदस्त अॅक्शन सीन्स करताना दिसणार आहे. आगामी 'मालिक' सिनेमात त्याची तगडी भूमिका आहे. पुलकित दिग्दर्शित या सिनेमाचा टीझर नुकताच आऊट करण्यात आला आहे. राजकुमारचे अॅक्शन सीन्स, एकापेक्षा एक डायलॉग्स सगळंच जबरदस्त आहे.

खांद्यावर बंदुक, हातात फावडा, अंगावर रक्त आणि समोरच्याची धुलाई अशा खतरनाक लूकमध्ये राजकुमार राव दिसतोय. समाजात दोन प्रकारचे लोक असतात एक जे घाम गाळून रोटी कमावतात आणि दुसरे जे रक्त गाळून आपल्या हक्काची रोटी हिसकावून घेतात. मी दुसऱ्या प्रकारचा व्यक्ती आहे. मी व्हिलन आहे की हिरो याबद्दल लोकांना काय वाटतं याबाबत मला फरक पडत नाही, माझ्या गोष्टीत मीच हिरो आहे. मालिक पैदा नही हुए तो क्या, बन तो सकते है! असा त्याचा डायलॉग आहे. राजकुमारला या कधीही न पाहिलेल्या अवतारात बघून चाहतेही वेडे झाले आहेत.


कधी रिलीज होणार?

'मालिक'च्या टीझरसोबत याची रिलीज डेटही जाहीर झाली आहे. ११ जुलै रोजी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कुमार तौरानींनी सिनेमाची निर्मिती केली आहे. हा अॅक्शन-थ्रिलर सिनेमा आहे ज्यामध्ये राजकुमार राव गँगस्टरच्या भूमिकेत आहे. काजकुमारला पहिल्यांदाच अशा लूकमध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक  आहेत.

Web Title: rajkumar rao starrer malik teaser out actor in never seen action look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.