'बाहुबली 2'ला मागे टाकत रजनीकांत यांचा '2.0'ने रिलीज आधीच केला नवा रेकॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 17:03 IST2018-11-22T16:57:26+5:302018-11-22T17:03:20+5:30
सुपरस्टार अक्षय कुमार आणि रजनीकांत स्टारर 2.0 या सिनेमाच्या रिलीजची मोठ्या आतुरतेने वाट पाहतायते. या सिनेमाच्या ट्रेलर आऊट झाल्यापासून फॅन्सची एक्साइटमेंट आणखी वाढली आहे

'बाहुबली 2'ला मागे टाकत रजनीकांत यांचा '2.0'ने रिलीज आधीच केला नवा रेकॉर्ड
सुपरस्टार अक्षय कुमार आणि रजनीकांत स्टारर 2.0 या सिनेमाच्या रिलीजची मोठ्या आतुरतेने वाट पाहतायते. या सिनेमाच्या ट्रेलर आऊट झाल्यापासून फॅन्सची एक्साइटमेंट आणखी वाढली आहे. अक्षय कुमार या सिनेमात वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. यात वीएफएक्सचे जबरदस्त काम आहे. 2.0 सिनेमाच्या रिलीज आधी त्याने प्रभासच्या बाहुबली2 चा रेकॉर्ड तोडला आहे.
बाहुबली सिनेमा 2017 मधला सर्वात हिट ठरला होता. यासिनेमाचे वैशिष्ट म्हणजे यातले वीएफएक्स होते. 'बाहुबली 2' देशभरातील 6500 स्क्रिनवर रिलीज करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार रजनीकांत यांच्या 2.0 सिनेमाने बाहुबलीला मागे टाकले आहे. 2.0 6800 स्क्रिनवर रिलीज करण्यात येणार आहे.
उत्तर प्रदेशात 4000 ते 4100 स्क्रिनवर रिलीज करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार यासिनेमाने रिलीज आधी अॅडवांस बुकींगमधून 120 कोटी कमावले आहे. रिलीजच्या आधी 100 कोटींचा आकडा पार करणार हा पहिला तमिळ सिनेमा आहे. वीएफएक्सवर जवळपास 500 कोटींचा खर्च करण्यात आला आहे.
‘2.0’ या सिनेमाला भारतातील सर्वात महागडा सिनेमा म्हणणे चुकीचे ठरणार नाही. विशेष म्हणजे हा संपूर्ण चित्रपट 3-डीमध्ये शूट केला गेला. हे ही भारतात पहिल्यांदाच झाले आहे. 29 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.