राज कुंद्राचा बॉलिवूड डेब्यू; पिक्चरची जबाबदारी घेण्यास फराह खानचा नकार, पाहा व्हिडिओ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 18:55 IST2023-10-09T18:54:14+5:302023-10-09T18:55:35+5:30
Raj Kundra Bollywood Debut: शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा बॉलिवूड डेब्यू करत आहे. या चित्रपटाचे नाव आणि प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली आहे.

राज कुंद्राचा बॉलिवूड डेब्यू; पिक्चरची जबाबदारी घेण्यास फराह खानचा नकार, पाहा व्हिडिओ...
Raj Kundra Bollywood Debut: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रासाठी (Raj Kundra) 2021, हे वर्ष खूपच वाईट होतं. कुंद्राला 'अॅडल्ट फिल्म स्कँडल' प्रकरणात तुरुंगात जावं लागलं. तुरुंगातून बाहेर आल्यापासून कुंद्राने आपला चेहरा मास्कने झाकून घेतला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तो मीडियासमोर आपला चेहरा लपवतो. चित्र-विचित्र मास्क घातल्यामुळे, कुंद्रा आता मास्क मॅन नावाने फेमस झाला आहे.
राज कुंद्राचाबॉलिवूड डेब्यू
आता राज कुंद्राबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. अनेक दिवसांपासून राज कुंद्राच्या बॉलिवूड डेब्यूच्या बातम्या येत होत्या. या बातम्या खऱ्या ठरल्या आहेत. कुंद्राने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने त्याच्या आयुष्यावर आधारित बायोपिकची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात राज कुंद्रा स्वतः काम करत आहे.
फराह खानचा चित्रपटासाठी नकार
इंस्टाग्रामवरील व्हिडिओमध्ये राज कुंद्रासह फराह खान आणि कॉमेडियन मुनावर फारुकी पत्रकार परिषदेत बसलेले दिसत आहेत. यावेळी मीडिया फराहला विचारतो की, 'मॅम, तुम्ही हा चित्रपट का बनवला?' यावर मुनव्वर म्हणतो, 'पैशासाठी...' तर फराह रागात वारंवार सांगते की, तिने हा चित्रपट बनवला नाही. यानंतर मीडिया विचारतो, 'अखेर हा चित्रपट कोणी बनवला?' यानंतर दोघेही राज कुंद्राकडे बोट दाखवतात आणि सांगतात की, यानेच तो बनवला आहे आणि तोच या चित्रपटाचा नायक आहे.
या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार
यानंतर फराह खान आणि मुनव्वर फारुकी पत्रकार परिषदेतून उठून जातात. तिथे एकटाच बसलेला राज कुंद्रा सांगतो की, त्याचा चित्रपट 3 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा मजेशीर व्हिडिओ कुंद्राच्या बॉलिवूड डेब्यूची माहिती आणि प्रदर्शनाची तारीक सांगण्यासाठी बनवण्यात आला आहे. UT 69, असे या चित्रपटाचे नाव असेल.