Raj Kundra: पोर्नोग्राफी प्रकरणामुळं शिल्पा शेट्टी एकटी पडली; जवळच्या मित्रांनीही पाठ फिरवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 06:06 IST2021-07-30T06:05:35+5:302021-07-30T06:06:22+5:30
अनेकांसाेबत तिचे मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या पोर्न चित्रपट प्रकरणात सर्वप्रथम राज कुंद्रा आणि त्यानंतर शिल्पा शेट्टीचेही नाव जाेडले गेले.

Raj Kundra: पोर्नोग्राफी प्रकरणामुळं शिल्पा शेट्टी एकटी पडली; जवळच्या मित्रांनीही पाठ फिरवली
मुंबई : राज कुंद्रा पोर्न चित्रपटनिर्मितीच्या प्रकरणात अडकल्यानंतर बाॅलिवूड आणि मित्रमंडळीने अभिनेत्री शिल्पा शेट्टीपासून पाठ फिरविल्याचे दिसत आहे. या वादापासून त्यांनी स्वत:ला दूर ठेवल्याचे दिसून येत आहे. शिल्पा शेट्टी सुमारे ३० वर्षांहून अधिक कालावधीपासून बाॅलिवूडमध्ये आहे. या कालावधीत तिने मनाेरंजन क्षेत्रात अनेक मित्र आणि मैत्रिणी जाेडल्या.
अनेकांसाेबत तिचे मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या पोर्न चित्रपट प्रकरणात सर्वप्रथम राज कुंद्रा आणि त्यानंतर शिल्पा शेट्टीचेही नाव जाेडले गेले. त्यानंतर तिच्याकडे सर्वांनीच पाठ फिरविली आहे. शिल्पाच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, तिच्या जवळच्या मित्रमंडळींपैकी एकानेही तिला पाठिंबा दिलेला नाही. एवढेच काय तर एकानेही साधा काॅल करून विचारपूसही केलेली नाही. त्यामुळे शिल्पा शेट्टी एकटी पडल्याचे दिसत आहे. सिनेसृष्टीने या वादापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. एक अभिनेता नाव उघड हाेऊ न देण्याच्या अटीवर म्हणाला की, हा वाद फार वेगळा आहे. नेहमी हाेणाऱ्या वादांप्रमाणे नाही. त्यामुळे काेणालाही या वादाच्या जवळ जायचे नाही.
उच्च न्यायालयात अर्ज; आज होणार सुनावणी
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने २९ प्रसारमाध्यम कर्मचारी आणि मीडिया हाऊसेविरुद्ध बदनामीचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला.
शेट्टी हिचा पती आरोपी असलेल्या पोर्नोग्राफी प्रकरणात ‘खोटे वार्तांकन आणि माझी प्रतिमा मलिन केल्याचा’ आरोप या अर्जात करण्यात आला आहे. या प्रकरणी शुक्रवारी सुनावणी होणार आहे.