राज कुंद्रा-उर्फी जावेद आमने सामने! मास्कमागे लपले चेहरे, नेटकरी म्हणतात, '36 चे 36 गुण...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 14:01 IST2023-10-10T13:59:38+5:302023-10-10T14:01:34+5:30
दोघंही समोरासमोर येतात आणि एकमेकांना हाय हॅलो करताना दिसत आहेत.

राज कुंद्रा-उर्फी जावेद आमने सामने! मास्कमागे लपले चेहरे, नेटकरी म्हणतात, '36 चे 36 गुण...'
विचित्र फॅशन सेन्समुळे उर्फी जावेद (Urfi Javed) कायम चर्चेत असते. तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तर शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) नेहमी मास्कमागे लपलेला दिसतो. हे दोन्ही फॅशनिस्टा जेव्हा आमने सामने येतात तेव्हा काय घडतं याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दोघंही समोरासमोर येतात आणि एकमेकांना हाय हॅलो करताना दिसत आहेत.
पोर्नोग्राफी केस प्रकरणानंतर राज कुंद्राला जामीन मिळताच तो ठिकठिकाणी मास्क लावूनच दिसला. नुकताच गणपतीतही तो शिल्पा शेट्टीसोबत मास्क लावूनच नाचताना दिसला. काही दिवसांपूर्वी त्याने स्टँडअप कॉमेडी केली. यावेळी तो स्वत:लाच ट्रोल करताना दिसला. काही मिनिटांच्या स्टँडअप कॉमेडीतही तो मास्क लावूनच होता. तर दुसरीकडे उर्फीच्या फॅशन बद्दल वेगळं सांगण्याची गरज नाही. ती नेहमी काही ना काही विचित्र कपडे घालूनच सर्वांसमोर येते. दोघंही सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत असतात. आता हे दोघं एके ठिकाणी समोरासमोर आले. यामध्ये दोघांचाही चेहरा दिसत नव्हता.
उर्फीने चॉकलेटी रंगाचा मास्क ड्रेस घातला आहे. यात तिचं संपूर्ण डोकं लपलं आहे. तिचा चेहराही दिसत नाही. वर गॉगल लावला आहे. तर राज कुंद्रा ब्लॅक शर्ट, ब्लू जीन्स आणि मास्क लावून दिसत आहे. उर्फी कारमधून उतरुन गेटवर उभी असते. ती पापाराझींना पोज देत असतानाच तिथे राज कुंद्राचीही गाडी येते. तोही गाडीतून उतरतो, उर्फीसमोर येताच दोघंही एकमेकांना 'हाय' करतात आणि राज कुंद्रा पुढे निघून जातो. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानीने सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही खूप मजा घेतली आहे. 'धन्य झालो आम्ही दोन नमुने एकसाथ पाहून' अशी मजेशीर कमेंट एकाने केली आहे. 'याला म्हणतात ३६ चे ३६ चे गुण जुळणे' असं म्हणत नेटकऱ्यांनी दोघांची खिल्ली उडवली आहे.