'रेड २' चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार, कधी आणि कुठे? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 18:23 IST2025-05-04T18:22:51+5:302025-05-04T18:23:38+5:30
राजकुमार गुप्ता दिग्दर्शित हा क्राईम थ्रिलर चित्रपट हा २०१८ मधील 'रेड' या चित्रपटाचा सिक्वेल आहे.

'रेड २' चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार, कधी आणि कुठे? जाणून घ्या
Raid 2 OTT Release: अभिनता अजय देवगण (Ajay Devgan), रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि वाणी कपूर स्टारर 'रेड-२' हा चित्रपट १ मे रोजी देशभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांत गर्दी करत आहेत. दरम्यान हा चित्रपट कुठे आणि कधी पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. चला तर जाणून घेऊया.
'रेड २'च्या OTT रिलीजबद्दल अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, काही अहवालांनुसार, या चित्रपटाचे डिजिटल हक्क हे Amazon Prime Video विकले गेले आहेत. त्यामुळे, हा चित्रपट येत्या १ ते २ महिन्यांच्या आत Amazon Prime Video वर उपलब्ध होऊ शकतो. राजकुमार गुप्ता दिग्दर्शित हा क्राईम थ्रिलर चित्रपट हा २०१८ मधील 'रेड' या चित्रपटाचा सिक्वेल आहे.
अजय देवगण हा 'रेड-२' मध्ये अमेय पटनायक या ऑफिसरच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. तर रितेश देशमुखने खलनायकाचं पात्र साकारलं आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, पहिल्याच दिवशी रेड- २ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली होती. या सिनेमाने प्रदर्शनाच्या दिवशी १९.२५ कोटींचा गल्ला जमवला. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने ११.७५ कोटींची कमाई केली आहे. तिसऱ्या दिवशी 'रेड २'ने बॉक्स ऑफिसवर १८ कोटींचा बिजनेस केला आहे. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, या सिनेमाने पहिल्या तीनच दिवसांत ४९.२५ कोटी कमावले आहेत. आता रविवारी 'रेड २'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.