आजीला पाहून खूश झाली राहा, टाळ्या वाजवत बोलताना दिसली; आलिया अन् रणबीरही पाहतच राहिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 09:45 IST2024-09-16T09:44:09+5:302024-09-16T09:45:49+5:30

राहाचा मस्ती मूड पहिल्यांदाच बघायला मिळत आहे.

Raha Kapoor happy to see grandmother Neetu Kapoor started to chitchat with her | आजीला पाहून खूश झाली राहा, टाळ्या वाजवत बोलताना दिसली; आलिया अन् रणबीरही पाहतच राहिले

आजीला पाहून खूश झाली राहा, टाळ्या वाजवत बोलताना दिसली; आलिया अन् रणबीरही पाहतच राहिले

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट (Alia Bhatt) यांची चिमुकली लेक राहा कपूर (Raha Kapoor) सध्या लाईमलाईटमध्ये आहे. राहाची कुठेही एक जरी झलक दिसली तरी चाहते खूश होतात. इतके दिवस कॅमेऱ्याकडे पाहून गोंधळलेली राहा आता चक्क बोलताना दिसली. राहा नेहमीच प्रश्नार्थक चेहऱ्याने सगळीकडे पाहायची पण आता ती किती बडबडीही आहे हे समोर आलं आहे. नक्की काय आहे व्हिडिओत बघा.

आज पहाटेच आलिया भट आणि रणबीर कपूर विमानतळावर दाखल झाले. आलियाने राहाला कडेवर घेतलं होतं. निळे डोळे, गोल गोरा चेहरा यामुळे राहा कायमच लक्ष वेधून घेते. विमानतळावरही सगळेच तिच्याकडे पाहत होते. नंतर मागून नीतू कपूर आल्या. आजीला पाहून राहा खूपच खूश झाली. तिच्या बोबड्या भाषेत ती आजीला काहीतरी सांगताना दिसली. राहाचा हा मूड पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद झाला आहे.  तसंच तिच्या गोड स्माईलने तर सगळ्यांना आकर्षित केलं. आलिया आणि रणबीरही तिच्याकडे कौतुकाने पाहत होते. 


या व्हिडिओवर चाहत्यांनीही प्रेमाचा वर्षा केला आहे. 'पहिल्यांदा राहाचा आवाज ऐकला','किती गोड आहे ही' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. राहाचा जन्म ६ नोव्हेंबर २०२२ रोजी झाला. दीड वर्षांची राहा आपल्या क्युटनेसमुळे आतापासूनच लाईमलाईटमध्ये आहे. 

याआधीही राहाचा घराखालील व्हिडिओ व्हायरल झाला होता. रणबीरसोबत ती इमारतीखाली चालताना दिसली होती. तिचा खेळकर मूड पहिल्यांदाच दिसला होता. तर आता तिच्या चिटचॅटनेही लक्ष वेधून घेतलंय.

Web Title: Raha Kapoor happy to see grandmother Neetu Kapoor started to chitchat with her