भर कार्यक्रमात स्टेजवरच राघव जुयाल पडला शाहरुख खानच्या पाया, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 15:55 IST2025-08-22T15:53:13+5:302025-08-22T15:55:36+5:30
अभिनेता राघव जुयालने शाहरुखसोबत केलेल्या कृतीनंतर नेटकऱ्यांची मनं जिंकून घेतली आहेत.

भर कार्यक्रमात स्टेजवरच राघव जुयाल पडला शाहरुख खानच्या पाया, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव, पाहा व्हिडीओ
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान कायमच चर्चेत असतो. शाहरुखसोबत काम करणं त्याला एकदा भेटणं ही चाहते आणि सहकलाकारांची इच्छा असते. शाहरुखचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. त्यामुळे समोर शाहरुख आला तर कधी कधी काय करावं हे कलाकारांनाही सुचत नाही. पण, अभिनेता राघव जुयालने शाहरुखसोबत केलेल्या कृतीनंतर नेटकऱ्यांची मनं जिंकून घेतली आहेत.
शाहरुखचा लेक आर्यन खानने नुकतंच सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे. आर्यन दिग्दर्शक म्हणून इंडस्ट्रीत पाऊल ठेवत आहे. 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'चा प्रीव्ह्यू लाँच सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत शाहरुख खान स्टेजवर उभा असल्याचं दिसत आहे. तेवढ्यात राघव जुयाल स्टेजवर येतो आणि थेट शाहरुख खानच्या पाया पडतो. काही सेकंदांसाठी काय झालं हे शाहरुखलाही कळत नाही. हा व्हिडीओ इन्स्टंट बॉलिवूडच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर करण्यात आला आहे.
हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी राघव जुयालवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये राघव जुयालचीही वर्णी लागली आहे. यामध्ये राघव महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यामुळे चाहतेही त्याला पाहण्यासाठी उत्सुक आहेत.