"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 13:16 IST2025-12-20T13:15:57+5:302025-12-20T13:16:21+5:30
शाहरुख खानने का केला होता राधिका आपटेला मेसेज?

"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
अभिनेत्री राधिका आपटे सध्या 'साली मोहोब्बत' आणि 'रात अकेली है:द बंसल मर्डर्स'सिनेमांमध्ये दिसत आहे. या सिनेमांच्या प्रमोशनसाठी राधिका काही दिवसांपूर्वीच भारतात आली. एरवी ती पती आणि लेकीसोबत लंडनमध्येच राहते. राधिकाने गेल्या वर्षीच लेकीला जन्म दिला. मुलीला सोडून ती पहिल्यांदाच दूर आली आहे. मात्र आता एप्रिलपर्यंत फक्त कुटुंबाला वेळ देणार असून तोपर्यंत ब्रेक घेणार असल्याचं तिने नुकतंच सांगितलं. दरम्यान राधिकाने एका मुलाखतीत शाहरुख खानसोबतचा एक किस्सा शेअर केला.
'मॅशेबल इंडिया'शी बोलताना राधिका आपटेनेशाहरुख खानने तिला फोन केल्याचा एक मजेशीर किस्सा सांगितला. ती म्हणाली, "मी जेवण करत होते. नंतर मला फोनवर एक मिस्ड कॉल दिसला. त्याच नंबरवरुन मेसेजही आला होता. 'मी शाहरुख खान. कृपया मला कॉल कर' असं त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं. मला आधी वाटलं कोणीतरी गंमत करत आहे कारण नंबर वेगळाच होता. मी माझ्या एजंटला शाहरुखचा नंबर मागितला. जेव्हा त्याने मला नंबर दिला तर तो हाच नंबर होता. मी लगेच शाहरुखला कॉल बॅक केला. तेव्हा तो मला म्हणाला, 'मी तुझा अंधाधुन सिनेमा पाहिला. मला तुझं काम खूप आवडलं. एवढंच सांगायला फोन केला होता.'
आणखी एक किस्सा सांगत राधिका पुढे म्हणाली, "एक दिवस मी शाहरुखला सकाळी ५ वाजता एका पार्टीमध्ये भेटले होते. तिथे शाहरुखने मला ओळखलं. त्याने माझ्याशी अर्धा तास गप्पा मारल्या. तो खूप चांगला आहे. आमची भेटही खूप छान होती."
राधिका आपटे मराठी कुटुंबात जन्माला आलेली पुण्याची मुलगी आहे. तिने मराठी, हिंदी तसंच हॉलिवूडमध्येही काम केलं आहे. ब्रिटीश व्हायोलिनिस्ट बेनेडिक्ट टेलरसोबत राधिकाने लग्न केलं होतं. आता त्यांना एक गोंडस मुलगीही आहे. सध्या राधिका भारतात असून बेनेडिक्ट लंडनमध्ये लेकीची काळजी घेत आहे.