'असं वाटलं तीन मृतदेह मार्गी लावतोय'; 2 हजारच्या नोटाबंदीवर R madhavan ची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2023 10:25 IST2023-05-21T10:23:52+5:302023-05-21T10:25:03+5:30

R. madhavan: सोशल मीडियावर सक्रीय असलेला आर. माधवन समाजात घडणाऱ्या घटनांवर अनेकदा उघडपणे भाष्य करत असतो. यावेळी त्याने २ हजारच्या नोटाबंदीवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

r madhavan spends 2000 rupee notes on petrol pump shares cryptic post on social media | 'असं वाटलं तीन मृतदेह मार्गी लावतोय'; 2 हजारच्या नोटाबंदीवर R madhavan ची पोस्ट

'असं वाटलं तीन मृतदेह मार्गी लावतोय'; 2 हजारच्या नोटाबंदीवर R madhavan ची पोस्ट

भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी दोन हजार रुपयांची नोट वितरणातून मागे घेत असल्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ सुरु झाली. शुक्रवारी हा निर्णय जाहीर केल्यानंतर शनिवारी अचानक व्यवहारात या नोटांची चलती सुरु झाल्याचं दिसून आलं. या प्रकरणी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण त्यांची मत मांडत आहे. यामध्येच प्रसिद्ध अभिनेता आर. माधवन (R madhavan) यानेही त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने त्याला आलेला अनुभव शेअर केला आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेला आर. माधवन समाजात घडणाऱ्या घटनांवर अनेकदा उघडपणे भाष्य करत असतो. यावेळी त्याने २ हजारच्या नोटाबंदीवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. त्याचीही प्रतिक्रिया मजेचा एक भाग असून त्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काय आहे आर. माधवनची पोस्ट

माधवनने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये पेट्रोल पंपावर त्याला आलेला अनुभव शेअर केला आहे. त्याने अलिकडेच त्याच्या गाडीत ६हजार रुपयांचं डिझेल भरलं आणि पैसे देत असताना २ हजारच्या तीन नोटा दिल्या. या नोटा देत असताना त्याला एखाद्या मृतदेहाची विल्हेवाट लावत असल्याचं फिलिंग येत असल्याचं त्याने म्हटलं.
“६हजार रुपयांचं डिझेल भरलं आणि पेट्रोल पंपावर २ हजारच्या तीन नोटा दिल्या. हे पैसे देताना शप्पथ अशी भावना मनात आली की जणू ३ मृतदेहांचीच विल्हेवाट लावत आहे,” असं माधवनने त्याच्या स्टोरीत लिहिल आहे.

दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी मोठा निर्णय घेत २ हजारच्या नोटांची छपाई बंद करण्याचे आदेश दिले. तसंच २३ मे २०२३ ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत या नोटा बँकांमध्ये बदली करता येतील असंही सांगितलं.

Web Title: r madhavan spends 2000 rupee notes on petrol pump shares cryptic post on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.