मुंबईतील थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दीत आर.माधवनने गुपचुप पाहिला 'धुरंधर २'; लोकांनी ओळखलंच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 11:19 IST2026-04-03T11:17:57+5:302026-04-03T11:19:02+5:30

'धुरंधर' या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर आता त्याचा दुसरा भाग म्हणजेच 'धुरंधर २' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून, हा चित्रपट पाहण्यासाठी स्वतः माधवनने हजेरी लावली

R. Madhavan secretly watched Dhurandhar 2 in a houseful of people in a theater in Mumbai | मुंबईतील थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दीत आर.माधवनने गुपचुप पाहिला 'धुरंधर २'; लोकांनी ओळखलंच नाही

मुंबईतील थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दीत आर.माधवनने गुपचुप पाहिला 'धुरंधर २'; लोकांनी ओळखलंच नाही

दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आर. माधवन (R-Madhavan) सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. 'धुरंधर' या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर आता त्याचा दुसरा भाग म्हणजेच 'धुरंधर २' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून, हा चित्रपट पाहण्यासाठी स्वतः माधवनने हजेरी लावली. एका चाहत्याने माधवनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, तो प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आर. माधवन अगदी साध्या कपड्यांमध्ये चित्रपटगृहात चित्रपट पाहताना दिसत आहे. कोणताही गाजावाजा न करता आर. माधवन मुंबईतील एका थिएटरमध्ये 'धुरंधर २' पाहण्यासाठी पोहोचला होता. अनेकांना आपल्यासोबत चक्क सिनेमातील अजय सन्याल बसले आहेत, हे माहितच नव्हतं. मात्र एका चाहत्याने अजय देवगणचा व्हिडिओ बनवला आणि एका खास कॅप्शनसह तो इंटरनेटवर पोस्ट केला. 



ही पोस्ट करुन तो चाहता कॅप्शनमध्ये लिहितो की, ''ISI तुम्ही काहीही प्लॅन बनवा. आम्ही तुम्हाला इतकंच सांगू इच्छितो की, अजय सन्याल यांची नजर प्रत्येक क्षण तुमच्यावर आहे. आर. माधवनसोबत पुन्हा एकदा 'धुरंधर २' बघायला मजा आली.'', असं लिहित त्या चाहत्याने माधवनचा फोटोही पोस्ट केला आहे. 

'धुरंधर'च्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता दुसऱ्या भागाबद्दलही प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. 'धुरंधर २' सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असून अवघ्या काही दिवसांत चित्रपटाने १००० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात संजय दत्त, आर. माधवन, रणवीर सिंग, अर्जुन रामपाल,  सारा अर्जुन यांच्या खास भूमिका आहेत.

Web Title : आर. माधवन ने मुंबई के थिएटर में चुपचाप देखी 'धुरंधर 2'

Web Summary : आर. माधवन ने मुंबई के एक थिएटर में चुपचाप 'धुरंधर 2' देखी। एक प्रशंसक ने अभिनेता को साधारण कपड़ों में फिल्म का आनंद लेते हुए कैद किया। आदित्य धर द्वारा निर्देशित 'धुरंधर 2' में संजय दत्त, रणवीर सिंह और अन्य कलाकार हैं, जिसने ₹1000 करोड़ से अधिक की कमाई की है।

Web Title : R. Madhavan Secretly Watches 'Dhurandhar 2' in Mumbai Theater

Web Summary : R. Madhavan watched 'Dhurandhar 2' in a Mumbai theater unnoticed. A fan captured the actor in simple clothes enjoying the film. 'Dhurandhar 2,' directed by Aditya Dhar, stars Sanjay Dutt, Ranveer Singh and others, and has grossed over ₹1000 crore.