Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'मध्ये होणार साई पल्लवीची एन्ट्री? साकारणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 11:45 IST2023-03-09T11:45:12+5:302023-03-09T11:45:55+5:30

साउथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आगामी चित्रपट 'पुष्पा २' (Pushpa 2)मुळे चर्चेत आहे.

Pushpa 2 : Sai Pallavi entry in Allu Arjun's 'Pushpa 2'? This role will be played | Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'मध्ये होणार साई पल्लवीची एन्ट्री? साकारणार ही भूमिका

Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'मध्ये होणार साई पल्लवीची एन्ट्री? साकारणार ही भूमिका

साउथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आगामी चित्रपट 'पुष्पा २' (Pushpa 2)मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट जेव्हापासून रिलीज झाला आहे तेव्हापासून या चित्रपटातील डायलॉग चाहत्यांच्या चांगलेच लक्षात राहिले आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटाने रिलीज नंतर बंपर कमाई केली आहे. आता प्रेक्षक दुसऱ्या भागाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे शीर्षक पुष्पा द रुल ठेवण्यात आले आहे. आता चित्रपटाची लेटेस्ट अपडेट समोर आली आहे. वृत्तानुसार या चित्रपटात आता साउथची प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी(Sai Pallavi)ची एन्ट्री झाली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुष्पा २मध्ये अभिनेत्री साई पल्लवीची एन्ट्री झाली आहे. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दुसऱ्या भागात रश्मिका मंदाना असणार आहे मात्र साई पल्लवीदेखील अल्लू अर्जुनच्या अपोझिट भूमिकेत दिसणार आहे. तिचा केमिओ असणार आहे. ती या चित्रपटाचे शूटिंग एका आठवड्यात पूर्ण करणार आहे. 


पुष्पा २मध्ये साईची वर्णी लागल्याच्या वृत्ताला अद्याप निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र हे वृत्त ऐकून चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच साई पल्लवी अल्लू अर्जुनसोबत काम करताना दिसेल. या जोडीला रुपेरी पडद्यावर पाहणे चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.

Web Title: Pushpa 2 : Sai Pallavi entry in Allu Arjun's 'Pushpa 2'? This role will be played