Video: शिट्टी, ढोलताशा आणि डान्स..; गृहप्रवेशाच्या वेळी पुलकित-क्रितीच्या आनंदाला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 11:45 IST2024-03-17T11:44:06+5:302024-03-17T11:45:27+5:30

पुलकित - क्रितीच्या लग्नानंतर त्यांच्या गृहप्रवेशाचा व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय

pulkit samrat kriti kharbanda griha pravesh video viral at delhi home | Video: शिट्टी, ढोलताशा आणि डान्स..; गृहप्रवेशाच्या वेळी पुलकित-क्रितीच्या आनंदाला उधाण

Video: शिट्टी, ढोलताशा आणि डान्स..; गृहप्रवेशाच्या वेळी पुलकित-क्रितीच्या आनंदाला उधाण

बॉलीवूडचे क्यूट कपल क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट यांनी  15 मार्च 2024 रोजी एकमेकांशी लग्न केलं. या जोडप्याने मानेसर येथील ITC भारत येथे जवळचे मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. लग्नानंतर क्रिती - पुलकीतचा गृहप्रवेशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

गृहप्रवेशाच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की पुलकित कारमधून उतरतो आणि आपल्या पत्नीला अर्थात क्रितीला घेण्यासाठी दुसऱ्या बाजूला जातो. पुढे व्हि़डीओत दिसतं की पुलकित - क्रिती उत्साहात नाचत आहेत. पुलकित आनंदात शिट्ट्या मारताना दिसतोय. तर क्रिती सुद्धा ढोलताशाच्या तालावर थिरकताना दिसतेय. क्रितीच्या हातावरची मेहंदी, बांगड्या आणि मंगळसुत्र अशा पारंपरिक लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.

तर दुसरीकडे पुलकितनेही पांढरा कुर्ता-धोती असा पारंपरिक पोशाख परिधान केलेला दिसतोय. पुलकित - क्रिती दोघेही एकमेकांच्या साथीने उत्साहात नाचत आहेत. पुलकितचे कुटुंबिय अन् मित्रमैत्रीणी सुद्धा त्यांना साथ देताना दिसत आहेत. डान्स झाल्यावर दोघांनी गृहप्रवेश केलेला दिसला. पुलकित - क्रिती गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये असून १५ मार्चला दोघांनीही एकमेकांसोबत लग्न केलं.

 

Web Title: pulkit samrat kriti kharbanda griha pravesh video viral at delhi home