इरफान खानला प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ अमेरिकाने दिला पुरस्कार, पण एका चुकीमुळे चिडले फॅन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 01:03 PM2021-03-27T13:03:25+5:302021-03-27T13:05:06+5:30

पुरस्कार सोहळ्याच्या आयोजकांकडून झालेल्या चुकांमुळे इरफानच्या फॅन्सकडून त्यांना चांगलेच सुनावण्यात आले.

Producers Guild of America Awards honour Irrfan Khan; misspell his name | इरफान खानला प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ अमेरिकाने दिला पुरस्कार, पण एका चुकीमुळे चिडले फॅन्स

इरफान खानला प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ अमेरिकाने दिला पुरस्कार, पण एका चुकीमुळे चिडले फॅन्स

googlenewsNext
ठळक मुद्देइरफान खानने इन्फर्नो, अ माइटी हार्ट, लाइफ ऑफ पाय, अमेजिंग स्पाइडर मॅन आणि जुरासिक वर्ल्ड यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. इरफान यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले असले तरी पुरस्कारावर इरफान यांच्या नावाचे स्पेलिंग चुकलेले होते. 

बॉलिवूड अभिनेता इरफान खानने काही महिन्यांपूर्वी जगाचा निरोप घेतला. इरफानने 29 एप्रिलला अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये सगळ्यांनाच धक्का बसला होता. इरफानने बॉलिवूडच नव्हे हॉलिवूडमध्ये देखील त्याचे प्रस्थ निर्माण केले होते. 

इरफानने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. इरफानला नुकतेच प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ अमेरिका (पीजीए) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पण या पुरस्कार सोहळ्याच्या आयोजकांकडून झालेल्या चुकांमुळे इरफानच्या फॅन्सकडून त्यांना चांगलेच सुनावण्यात आले.

इरफान खानने इन्फर्नो, अ माइटी हार्ट, लाइफ ऑफ पाय, अमेजिंग स्पाइडर मॅन आणि जुरासिक वर्ल्ड यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. इरफान यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले असले तरी पुरस्कारावर इरफान यांच्या नावाचे स्पेलिंग चुकलेले होते. 

प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ अमेरिका (पीजीए) हा पुरस्कार सोहळा 24 मार्च 2021 ला आयोजित करण्यात आला होता. इरफानच्या नावाचे स्पेलिंग Irrfan Khan च्या ऐवजी Irrif Kahn असे लिहिण्यात आले होते. इरफान खानच्या नावाची स्पेलिंग चुकीची पाहून त्यांच्या फॅन्सना प्रचंड राग आला होता. 

इरफान खानच्या अभिनयाने सजलेला ‘द साँग ऑफ स्कॉर्पिअन्स’ हा अखेरचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. खरं तर हा चित्रपट इरफानचा शेवटचा प्रोजेक्ट नव्हता. पण बरीच वर्षे हा चित्रपट प्रदर्शनच्या प्रतीक्षेत होता. हा चित्रपट त्याच्या करिअरमधील थिएटरमध्ये रिलीज होणारा शेवटचा चित्रपट ठरणार आहे. यापूर्वी ऑगस्ट 2017 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये पार पडलेल्या 70 व्या लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा प्रीमिअर झाला होता. ‘द साँग ऑफ स्कॉर्पिअन्स’ या चित्रपटात इरफान खानने एका व्यापाराची भूमिका साकारली आहे. इराणी अभिनेत्री गोलशिफ्तेह फरहानी आणि ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री वहीदा रहमान यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

Web Title: Producers Guild of America Awards honour Irrfan Khan; misspell his name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.