'या' टीव्ही कलाकारासोबत झालं असतं प्रियंकाचं लग्न, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 16:22 IST2018-07-26T16:14:07+5:302018-07-26T16:22:53+5:30

काय तुम्हाला माहीत आहे की, प्रियंकाच्या मावशीमुळे प्रियंकाचं लग्न काही वर्षांपूर्वीच झालं असतं आणि तेही एका टीव्ही कलाकारासोबत.

Priyanka Chopra's aunty wanted her to marry television actor Mohit Raina | 'या' टीव्ही कलाकारासोबत झालं असतं प्रियंकाचं लग्न, पण...

'या' टीव्ही कलाकारासोबत झालं असतं प्रियंकाचं लग्न, पण...

मंबई : बॉलिवूड देसी गर्ल प्रियंका चोप्रा अमेरिकन गायक निक जोनसला डेट करत असल्याने सध्या चांगलीच चर्चेत आहे. दोघांनाही अनेक ठिकाणी एकत्र बघण्यात आलंय. इतकंच नाही तर दोघे एकमेकांच्या परिवारांनाही भेटले आहेत. आता दोघांच्या लग्नाच्याही चर्चा होऊ लागल्या आहेत. पण काय तुम्हाला माहीत आहे की, प्रियंकाच्या मावशीमुळे प्रियंकाचं लग्न काही वर्षांपूर्वीच झालं असतं आणि तेही एका टीव्ही कलाकारासोबत.

झालं असं होतं की, प्रियंकाच्या मावशीला हा टीव्ही कलाकार प्रियंकासाठी खूप भावला होता. प्रियंकाने याच्याशी लग्न करावं असं तिच्या मावशीला वाटत होतं. पण तसं होऊ शकलं नाही. पण जर प्रियंकाने होकार दिला असता तर आज तिचं लग्न झालेलं असतं. 

काही महिन्यांपूर्वी प्रियंकाने स्वत: या गोष्टीचा खुलासा केला होता. प्रियंकाने सांगितले होते की, तिच्या मावशीला वाटत होतं की, तिने 'देवों के देव - महादेव' मालिकेतील अभिनेता मोहित रैनासोबत लग्न करावं. कारण मोहितमध्ये प्रियंकाचा पती होण्याचे आणि त्यांच्या घरचा जावई होण्याचे सर्व गुण आहेत. 

प्रियंकाची मावशी मोहितच्या कामाने आणि त्याच्या इमानदारीने प्रभावित झाली होती. त्यामुळे तिला असं वाटत होतं की, प्रियंकाने मोहितसोबत लग्न करावं. ही मावशी मोहित आणि प्रियंकाच्या लग्नाबाबत फार गंभीर होती. मीडिया रिपोर्टनुसार, मोहितच्या परिवारालाही ही बाब माहिती होती. 

पण काहीतरी बिनसलं आणि प्रकरण थंड झालं. सध्या मोहित नागिन फेम मौनी रॉयला डेट करत आहे. या दोघांची जोडी प्रेक्षकांनी मालिकेतही पसंत केली. 

Web Title: Priyanka Chopra's aunty wanted her to marry television actor Mohit Raina