मामी फेस्टिव्हलसाठी 'देसी गर्ल' मुंबईत दाखल, गळ्यातील पेंडंटने वेधलं लक्ष; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 09:37 IST2023-10-27T09:36:37+5:302023-10-27T09:37:47+5:30
विमानतळावर प्रियंका चोप्रा झाली नर्व्हस

मामी फेस्टिव्हलसाठी 'देसी गर्ल' मुंबईत दाखल, गळ्यातील पेंडंटने वेधलं लक्ष; Video व्हायरल
'ग्लोबल स्टार' प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) बऱ्याच महिन्यांनी मुंबईत आली आहे. आज सकाळीच पापाराझींनी तिला विमानतळावर स्पॉट केले. बहीण परिणीती चोप्राच्या लग्नासाठी प्रियंका आली नव्हती. मात्र आता ती मामी फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचली आहे. आजपासून फेस्टिव्हलची सुरुवात होत असून 5 नोव्हेंबर पर्यंत हा फिल्म फेस्टिव्हल सुरु असणार आहे.
प्रियंका चोप्रा जियो मामी फिल्म फेस्टिव्हल २०२३ साठी भारतात आली आहे. ब्लॅक क्रॉप टॉप, ग्रे पँट्स, ब्लॅक जॅकेट असा तिचा स्टायलिश लुक होता. तसंच गळ्यातील 'मालती' नावाच्या पेंडंट आकर्षक होतं. प्रियंका विमानतळामधून बाहेर येताच पापाराझींनी गर्दी केली. यावेळी अभिनेत्री काहीशी नर्व्हस दिसत असल्याचं नेटकऱ्यांना जाणवलं. तसंच प्रियंका एकटीच आलेली दिसली तिच्यासोबत लेक मालती मेरी नसल्याने चाहते निराश झाले.
प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती नुकतीच 'सिटाडेल' या वेबसिरीजमध्ये दिसली. 'लव अगेन' या हॉलिवूड सिनेमातही तिने मुख्य भूमिका साकारली. आता ती आगामी 'हेड्स ऑफ स्टेट्स' आणि 'इट्स ऑल कमिंग बॅक टू' या सिनेमात दिसणार आहे.