हिला झालंय तरी काय?, प्रियंका चोप्राच्या चेहऱ्यावरील जखमा पाहून चाहते झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 16:20 IST2022-05-18T15:35:54+5:302022-05-18T16:20:13+5:30

प्रियांकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्याला दुखापत झाल्याची दिसतेय.. तिचा हा फोटो पाहिल्यानंतर चाहते चिंतेत आहे.

Priyanka chopra shared picture with injured face fan said what happened are you ok | हिला झालंय तरी काय?, प्रियंका चोप्राच्या चेहऱ्यावरील जखमा पाहून चाहते झाले हैराण

हिला झालंय तरी काय?, प्रियंका चोप्राच्या चेहऱ्यावरील जखमा पाहून चाहते झाले हैराण

देसीगर्ल प्रियंका चोप्रा अभिनेत्री प्रियांका चोप्रा लग्नानंतर परदेशात स्थायिक झाली असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच चर्चेत असते. प्रियांकाने तिच्या स्टायलिश लूकमुळे नेहमी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते, मात्र यावेळी प्रियांकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्याला दुखापत झाल्याची दिसतेय.. तिचा हा फोटो पाहिल्यानंतर चाहते चिंतेत आहे. फोटोत प्रियंकाच्या चेहऱ्याला रक्त लागले दिसतेय. 

अभिनेत्री प्रियंका चोप्राने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर खूप सूज आहे, तर तिच्या ओठ आणि नाकाजवळ रक्तही दिसत आहे. हा फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिले की,  'तुमचा देखील दिवस एवढाच कठिण होता?'.  प्रियांकाच्या या फोटो कमेंट करुन एका नेटकऱ्यानं विचारलं, 'चेहऱ्याला नक्की काय झालं आहे?' तर दुसऱ्याने लिहिले, 'तू ठीक आहेस' 

यावरून प्रियंका चोप्राचा हा फोटो शूटदरम्यान काढण्यात आल्याचे समजते. प्रियंका लवकरच हॉलिवूड अभिनेता मॅक अँथनीसोबत एंडिंग थिंग्ज या चित्रपटात दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांकाचा हा चित्रपट अ‍ॅक्शन थ्रिलर असणार आहे.

प्रियांकाने शेअर केला मुलीचा फोटो
मदर्स डेच्या निमित्ताने प्रियंका चोप्राने  तिच्या चिमुकलीचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये मुलीचा चेहरा नीट दिसत नसला तरी चाहत्यांसाठी मुलीची फक्त एक झलक पुरेशी आहे. प्रियांका चोप्राने शेअर केलेल्या फोटोमध्ये पती निक जोनासही(Nick Jonas) तिच्यासोबत दिसत होता. प्रियांका तिच्या बाळाला मिठी मारत आहे आणि निक त्याच्या मुलीकडे प्रेमाने पाहत आहे.

 

 

Web Title: Priyanka chopra shared picture with injured face fan said what happened are you ok