Priyanka Chopra : "आयुष्यातील काही पुरुष माझं यश बघून..." असमानतेवर प्रियांका चोप्रा स्पष्टच बोलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 11:44 IST2023-04-19T11:42:05+5:302023-04-19T11:44:04+5:30

बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा सध्या तिच्या अनेक विधानांनी चर्चेत असते

priyanka chopra says some men felt insecure while watching her success | Priyanka Chopra : "आयुष्यातील काही पुरुष माझं यश बघून..." असमानतेवर प्रियांका चोप्रा स्पष्टच बोलली

Priyanka Chopra : "आयुष्यातील काही पुरुष माझं यश बघून..." असमानतेवर प्रियांका चोप्रा स्पष्टच बोलली

बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या तिच्या अनेक विधानांनी चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिने बॉलिवूडवर निशाणा साधत तिला कसे कॉर्नर केले गेले होते हे सांगितले. तर आता तिचं आणखी एक विधान चर्चेत आलं आहे. आयुष्यात अनेक असे पुरुष आले जे मला मिळत असलेलं यश बघून असुरक्षित झाले असा खुलासा प्रियंकाने केला आहे. 

'सिटाडेल' (Citadel) या हॉलिवूडसिनेमाच्या प्रमोशनवेळी प्रियंकाने दिलेल्या मुलाखतीत हे भाष्य केले आहे. ती म्हणाली, 'माझ्या आयुष्यात असे काही चांगले पुरुष आहेत ज्यांना माझं यश बघून अजिबातच इर्षा वाटत नाही. मात्र आयुष्यात असेही काही पुरुष आले ज्यांना नेहमीच असुरक्षित वाटलं. पुरुषांनी त्यांच्या स्वातंत्र्याचा आनंद घेतला आहे. कुटुंबाचा प्रमुख म्हणून स्वत:चा गौरव केला आहे. मात्र हे त्यांच्यासाठीच धोकादायक आहे कारण जेव्हा महिला असं करतात किंवा महिला जास्त यश मिळवते, पुरुष घरी राहतो आणि महिला बाहेर जाते तेव्हा त्यांना असुरक्षित वाटतं.'

प्रियंकाचा 'सिटाडेल' (Citadel) हा हॉलिवूड सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. हॉलिवूडमध्ये पदार्पण करुन प्रियंकाला १० वर्ष झाली मात्र आता पहिल्यांदाच तिला मुख्य भूमिका करायला मिळाली आहे. हा सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर 28 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. प्रियंकाने नुकतेच भारतातही सिनेमाचे जोरदार प्रमोशन केले होते.

Web Title: priyanka chopra says some men felt insecure while watching her success