'मिस वर्ल्ड'नंतर प्रियंकाचं तिच्याच शहरात स्वागत का नाही झालं? आईने सांगितलं कटू सत्य; म्हणाली-

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 15:56 IST2025-02-27T15:56:26+5:302025-02-27T15:56:55+5:30

जगात नाव गाजवून आलेली मिस वर्ल्ड प्रियंका भारतात आल्यावर काय घडलं, याचा खुलासा प्रियंकाच्या आईन केला (priyanka chopra)

priyanka chopra not experiece grand welcome after she won miss world bareli | 'मिस वर्ल्ड'नंतर प्रियंकाचं तिच्याच शहरात स्वागत का नाही झालं? आईने सांगितलं कटू सत्य; म्हणाली-

'मिस वर्ल्ड'नंतर प्रियंकाचं तिच्याच शहरात स्वागत का नाही झालं? आईने सांगितलं कटू सत्य; म्हणाली-

प्रियंका चोप्रा (priyanka chopra) ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. प्रियंका सध्या जगभरातले विविध प्रोजेक्टस गाजवत आहे. प्रियंका केवळ अभिनेत्रीच नाही तर पॉप सिंगरही आहे. प्रियंका आज जरी जगात लोकप्रिय असली तरीही तिच्या करिअरची सुरुवात काहीशी वेगळी होती. सभोवतालच्या समाजाच्या संकुचित विचारसरणीचा तिला सामना करावा लागलेला. हा किस्सा असाच... जेव्हा प्रियंका चोप्रा 'मिस वर्ल्ड' स्पर्धा जिंकून आली होती, तेव्हा तिच्याच शहरात अभिनेत्रीचं स्वागत करण्यात आलं नव्हतं. काय होतं कारण?

प्रियंका चोप्राचं मिस वर्ल्डनंतर स्वागत झालं नाही

प्रियंका चोप्राची आई मधु चोप्रा यांनी लेहरे टीव्हीच्या एका मुलाखतीत हा खास किस्सा शेअर केला. मधु म्हणाल्या की, "प्रियंका मिस वर्ल्ड जिंकून बरेलीला परत आली. परंतु बरेलीमध्ये आमचं अजिबात स्वागत करण्यात आलं नाही. स्त्री शोषण असं कारण देऊन राज्य प्रशासनाने प्रियंकाची यशस्वी कामगिरी नाकारली. प्रियंका ज्या मूळ शहरातून येते (जमशेदपूर) तिथेच तिचं स्वागत करण्यात येईल. आम्ही इथे स्वागत करणार नाही, असं प्रशासनाचं म्हणणं होतं."

"तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी परवानगी देऊनही प्रियंकाचं ग्रँड वेलकम करण्यात आलं नाही. याशिवाय तिच्या विजयासाठी कोणत्याही भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं नव्हतं. प्रियंकाचं स्वागत न करण्यासाठी राज्य प्रशासन सतत नवनवीन कारणं देत होते. परंतु मुंबईत मात्र संपूर्ण इंडस्ट्रीने मोठ्या मनाने प्रियंकाचं स्वागत  केलं. प्रियंकाच्या टॅलेंटला ओळखून फिल्ममेकर्सने तिला सिनेइंडस्ट्रीत काम करण्याची संधी दिली." अशाप्रकारे प्रियंकाच्या आईने कटू सत्य सर्वांना सांगितलं. प्रियंका लवकरच 'बाहुबली', RRR फेम राजामौलींच्या आगामी सिनेमात महेश बाबूसोबत झळकणार असल्याची चर्चा आहे. 

 

Web Title: priyanka chopra not experiece grand welcome after she won miss world bareli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.