NickYanka Reception Inside Videos: प्रियांका व निकच्या रिसेप्शनमध्ये रंगला ‘पिंगा’ डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 10:40 IST2018-12-21T10:39:57+5:302018-12-21T10:40:43+5:30
धम्माल नाच-गाणे, धम्माल मस्ती. होय, प्रियांका व निकच्या रिसेप्शनचे अनेक इनसाईड व्हिडिओ समोर आले आहेत. यात प्रियांका, निक, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण असे सगळे धम्माल डान्स करताना दिसत आहेत.

NickYanka Reception Inside Videos: प्रियांका व निकच्या रिसेप्शनमध्ये रंगला ‘पिंगा’ डान्स
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास या सेलिब्रिटी कपलचे तिसरे रिसेप्शन काल रात्री मुंबईत पार पडले. हे रिसेप्शन कमालीचे शानदार राहिले. या रिसेप्शन पार्टीत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली आणि मग रंगली पार्टी. धम्माल नाच-गाणे, धम्माल मस्ती. होय, प्रियांका व निकच्या रिसेप्शनचे अनेक इनसाईड व्हिडिओ समोर आले आहेत. यात प्रियांका, निक, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण असे सगळे धम्माल डान्स करताना दिसत आहेत.
यातील सगळ्यांत खास व्हिडिओ आहे तो, प्रियांकासोबत रणवीरचा ‘पिंगा’ डान्स. या डान्समधील रणवीरचा उत्साह पाहण्यासारखा आहे. दीपिकाही प्रियांकासोबत या गाण्यावर थिरकली.
‘पिंगा’ हे गाणे संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटात प्रियांका, दीपिका व रणवीर असे तिघेही दिसले होते.
प्रियांका चोप्रा व निक जोनास यांनी गत १ व २ डिसेंबरला जोधपूरच्या उमेद भवनात लग्नगाठ बांधली.
गत रात्री निकयांकाने मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन दिले. या ग्रॅण्ड पार्टीत प्रियांकाने पिस्ता रंगाचा लहंगा घातला होता तर निक हिरव्या सूटमध्ये होता. निकयांका या रिसेप्शनमध्ये मीडियासमोर रोमॅन्टिक होताना दिसले. मीडियासोबत त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. सर्वांचे आभार मानले.
परवा मुंबईतच प्रियांका व निकचे दुसरे रिसेप्शन पार पडले. या रिसेप्शपमध्ये केवळ कुटुंबाचे सदस्य आणि खास पाहुण्यांना निमंत्रित केले गेले होते.
त्याआधी दोघांनीही दिल्लीत एक रिसेप्शन दिले होते.जोधपूरच्या उमेद भवनात गत १ व २ डिसेंबरला ख्रिश्चन व हिंदू अशा दोन्ही पद्धतीने दोघांनीही लग्न केले.
प्राप्त माहितीनुसार, प्रियांका व निक येत्या २८ डिसेंबरला हनीमूनसाठी स्वित्झर्लंडला रवाना होतील. १० जानेवारीला ते परततील.