प्रियंका चोप्राच्या हातून निसटला ब्लॉकबस्टर सिनेमा, अल्लू अर्जुन-एटलीसोबत करणार नाही काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 15:52 IST2025-04-07T15:51:40+5:302025-04-07T15:52:07+5:30

Priyanka Chopra : गेल्या काही दिवसांपासून असे वृत्त समोर येत आहे की, अल्लू अर्जुन आणि एटलीच्या आगामी सिनेमात बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पण ही अफवा असल्याचं म्हटलं जातंय.

Priyanka Chopra loses out on a blockbuster film, won't work with Allu Arjun-Atlee | प्रियंका चोप्राच्या हातून निसटला ब्लॉकबस्टर सिनेमा, अल्लू अर्जुन-एटलीसोबत करणार नाही काम

प्रियंका चोप्राच्या हातून निसटला ब्लॉकबस्टर सिनेमा, अल्लू अर्जुन-एटलीसोबत करणार नाही काम

गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि एटलीच्या आगामी सिनेमात बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जातंय. मात्र आता न्यूज एजेंसी आईएएनएसच्या सूत्रांनी या वृत्ताला फेटाळून लावून अफवा असल्याचं म्हटलं आहे.

या प्रोजेक्टशी निगडित असलेल्या एका सूत्राने आईएएनएसला या वृत्तामागचे सत्य सांगितले आहे. ते म्हणाले की, "अल्लू अर्जुन अभिनीत आणि ॲटली दिग्दर्शित हा चित्रपट बिग बजेट प्रोजेक्ट आहे आणि त्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. जेव्हापासून या प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली, तेव्हापासून अनेक नावं याच्याशी जोडल्या जात असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. प्रियांका चोप्राचे नाव देखील चर्चेत आहे, परंतु तिचा या चित्रपटाशी काहीच संबंध नाही.या संदर्भातील वृत्त निव्वळ अफवा आहेत."

अल्लू अर्जुन दिसणार डबल रोलमध्ये

या बहुप्रतिक्षित ड्रामा चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत कोणती अभिनेत्री दिसणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुन या चित्रपटात डबल रोलमध्ये दिसणार आहे, तर याआधी या चित्रपटात दोन नायक असणार असल्याची चर्चा होती. अल्लू अर्जुनच्या टीमने पुष्टी केली आहे की, अल्लू अर्जुन या प्रोजेक्टमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अद्याप त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात असल्याने, शीर्षक नसलेल्या चित्रपटाचे कलाकार, क्रू आणि कथेबद्दल अधिक तपशील अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

प्रियांका चोप्रा या प्रोजेक्टमध्ये आहे व्यग्र
अल्लू अर्जुन शेवटचा 'पुष्पा २' मध्ये दिसला होता, या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले. दरम्यान, प्रियांका चोप्रा सध्या एसएस राजामौली यांच्या 'एसएसएमबी २९' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकतीच ती ओडिशामध्ये एका चित्रपटाचे शूटिंग करत होती. तिच्या पुढच्या चित्रपटात ती पहिल्यांदा महेश बाबूसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटात महेश बाबू भगवान हनुमानापासून प्रेरित भूमिकेत दिसणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट ९००-१००० कोटी रुपयांच्या मोठ्या बजेटमध्ये तयार केला जाईल. हा बहुचर्चित चित्रपट दोन भागात बनण्याची शक्यता आहे.

Web Title: Priyanka Chopra loses out on a blockbuster film, won't work with Allu Arjun-Atlee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.