Met Gala 2025: ...अन् सर्वांसमोर प्रियंकाने केलं निकला किस, व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 12:02 IST2025-05-06T12:01:50+5:302025-05-06T12:02:41+5:30

मेट गाला २०२५ या फॅशन इव्हेंटमध्ये प्रियंका चोप्रा आणि निक जोनस सहभागी झाले होते. दोघांच्या रोमँटिक अंदाजाने सर्वांचं लक्ष वेधलं

priyanka chopra kissed nick jones in front of everyone at met gala 2025 viral video | Met Gala 2025: ...अन् सर्वांसमोर प्रियंकाने केलं निकला किस, व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

Met Gala 2025: ...अन् सर्वांसमोर प्रियंकाने केलं निकला किस, व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

कालपासून जगभरात 'मेट गाला २०२५' या इव्हेंटची (met gala 2025) चर्चा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या फॅशन शोची खूप चर्चा असते. विशेष म्हणजे यावेळी  'मेट गाला २०२५' इव्हेंटमध्ये शाहरुख खान, दिलजीत दोसांझ आणि कियारा अडवाणी पहिल्यांदाच झळकले. या बॉलिवूड सेलिब्रिटींची चर्चा होत असतानाच सध्या  'मेट गाला २०२५'मध्ये प्रियंका चोप्रा (priyanka chopra) आणि निक जोनस या कपलची चर्चा आहे. प्रियंका आणि निकचा  'मेट गाला २०२५' इव्हेंटमध्ये असलेला रोमँटिक अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.

...प्रियंका आणि निकने केलं एकमेकांना किस

'मेट गाला २०२५'मध्ये गेलेल्या प्रियंका आणि निकचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत प्रियंका आणि निक 'मेट गाला २०२५'मध्ये एन्ट्री करतात. दोघांनीही रेट्रो लूक परिधान केला होता. याशिवाय दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि सर्वांसमोर किस केलं. प्रियंका आणि निकचा हा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांचं चांगलंच लक्ष वेधून घेत आहे. ब्लॅक आणि व्हाईट कपड्यांची थीम करुन प्रियंका आणि निकच्या रोमँटिक अंदाजाची चर्चा रंगली आहे.



लोकांच्या भन्नाट कमेंट्स

प्रियंका आणि निकचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिलंय, "वाह वाह रामजी...", आणखी एका युजरने लिहिलंय,
"प्रियंका आणि निक दोघांचीही फॅशन सुपरहिट आहे", एका युजरने लिहिलंय, "मेट गालामधील दोघांचाही लूक लक्षवेधी आहे", अशा शब्दात प्रतिक्रिया देत प्रियंका-निकचं त्यांच्या चाहत्यांनी कौतुक केलंय. प्रियंका सध्या अनेक आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्समध्ये काम करत असून ती लवकरच राजमौली यांच्या साउथ सिनेमात याशिवाय 'क्रिश ४' सिनेमात झळकणार आहे.

Web Title: priyanka chopra kissed nick jones in front of everyone at met gala 2025 viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.