कपिल शर्माच्या शोमध्ये 'देसी गर्ल'चा धमाका! प्रियंकानं पती निकबद्दल केला मोठा खुलासा, पाहा प्रोमो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 13:46 IST2025-12-18T13:45:36+5:302025-12-18T13:46:57+5:30
नुकताच या शोचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. यात प्रियंका आणि कपिलची धमाकेदार कॉमेडी पाहायला मिळाली आहे.

कपिल शर्माच्या शोमध्ये 'देसी गर्ल'चा धमाका! प्रियंकानं पती निकबद्दल केला मोठा खुलासा, पाहा प्रोमो
कपिल शर्मा आपल्या लोकप्रिय शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा नवीन सीझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नवीन सीझनच्या पहिल्याच एपिसोडमध्ये ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा जोनास पाहुणी म्हणून हजेरी लावणार आहे. नुकताच या शोचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. यात प्रियंका आणि कपिलची धमाकेदार कॉमेडी पाहायला मिळाली आहे.
प्रोमोमध्ये कपिल नेहमीप्रमाणे आपल्या मोडक्या-तोडक्या इंग्रजीने प्रियंकाला प्रभावित करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, प्रियंका जेव्हा अस्खलित इंग्रजीत बोलायला लागते, तेव्हा कपिलची बोलती बंद होते. इतकेच नाही तर, प्रियंका आपल्या खास शैलीत कपिलची टिंगल करतानाही दिसते.
कपिल प्रियंका सोबत फ्लर्ट करण्याची एकही संधी सोडत नाही. गप्पांच्या ओघात कपिलने तिला पती निक जोनाससोबतच्या पहिल्या भेटीबद्दल विचारलं. "तुमच्या दोघांमध्ये कबुतराने संदेश पोहोचवण्याचं काम केलं होतं का?" असा सवाल कपिल करतो. यावर प्रियंका हसत उत्तर देते, "कबुतराने नाही, तर ट्विटरनं केलं होतं". मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियंका आणि निकची पहिली ओळख ही एका कॉमन मित्राद्वारे झाली होती. काही मिनिट्स दोघे एकमेकांशी बोलले. मात्र निकला पहिल्याच भेटीत प्रियंका खूपच आवडली आणि त्याने तिला ट्विटरवर डायरेक्ट मेसेज केला. तेथूनच त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली.
कधी आणि कुठे पाहता येईल?
'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा हा धमाकेदार पहिला एपिसोड २० डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजता फक्त नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. प्रियंका चोप्रा आणि कपिल शर्मा यांची जुगलबंदी नेहमीच खास असते. आता हा खास भाग पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.