प्रियांका-निक आणि दीपिका-रणवीर यांच्या लग्नाच्या तारखेचा असा आहे घोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 11:56 IST2018-10-24T11:47:51+5:302018-10-24T11:56:47+5:30

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे लग्नाची चर्चा सुरु आहे. दोघांवर आतापर्यंत सगळीकडून शुभेच्छांना वर्षाव देखील होतोय

Priyanka Chopra And Nick Jonas Wedding Dates Gonna Clash With Deepika Padukone And Ranveer Singh | प्रियांका-निक आणि दीपिका-रणवीर यांच्या लग्नाच्या तारखेचा असा आहे घोळ

प्रियांका-निक आणि दीपिका-रणवीर यांच्या लग्नाच्या तारखेचा असा आहे घोळ

ठळक मुद्दे फक्त 30 लोक दीपवीरच्या लग्न सोहळ्यात असणार आहेत 1 डिसेंबरला मुंबईत ग्रँड रिसेप्शन ठेवणार आहेत

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे लग्नाची चर्चा सुरु आहे. दोघांवर आतापर्यंत सगळीकडून शुभेच्छांना वर्षाव देखील होतोय. दीपवीरचे लग्न जरी इटलीमध्ये होणार असेल तर मुंबई आणि बेंगळुरुमध्ये रिसेप्शन होणार आहे. 14 आणि 15 तारखेला दोघे लग्न करणार आहेत. या सोहळा ते खूपच खासगी ठेवणार आहेत फक्त 30 लोक लग्न सोहळ्यात सामील असणार आहेत. मोबाईल फोन आणि कॅमेरांना लग्न सोहळ्यात परवानगी नाही आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार हे कपल 1 डिसेंबरला मुंबईत ग्रँड रिसेप्शन ठेवणार आहेत. बॉलिवूडच्या कलाकार या रिसेप्शनमध्ये सहभागी होणार असल्याचे कळतेय. याच दरम्यान प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचे सुद्धा लग्न आहे. त्यामुळे दीपिकाच्या रिसेप्शनची तारीख आणि प्रियांकाच्या लग्नाची तारखेत क्लॅश होण्याची शक्यता आहे. रणवीर आणि दीपिका यांनी दोघांनी सर्वप्रथम गोलियों की रासलीला-रामलीला या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा त्यांचा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटानंतर त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. त्यानंतर बाजीराव मस्तानी, पद्मावत यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांच्या जोडीचा जलवा प्रेक्षकांना पाहायला मिळाला. त्या दोघांची केमिस्ट्री तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते.

प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर  रणवीर सध्या ‘सिम्बा’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय ‘गली ब्वॉय’ आणि १९९३ व्या क्रिकेट वर्ल्ड कप विजयावर आधारित ‘८३’ या चित्रपटातही तो बिझी आहे. तर  मेघना गुलजारचा आगामी सिनेमा दीपिकाने साईन केला आहे.  

Web Title: Priyanka Chopra And Nick Jonas Wedding Dates Gonna Clash With Deepika Padukone And Ranveer Singh