पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 11:37 IST2025-07-18T11:34:25+5:302025-07-18T11:37:36+5:30

...यातच, निक आणि प्रियांका यांचा आणखी एक व्हिडिओ सामोर आला आहे. या व्हिडिओमध्ये, पत्नीशिवाय आपली काय स्थिती होते आणि पत्नी असताना काय असते? यासंदर्भात निक सांगताना दिसत आहे.

priyanka chopra and nick jonas lip lock VIDEO romantic look seen on the beach | पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO

पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO

बॉलिवुडची 'देसी गर्ल' अशी ओळख असलेली प्रियांका चोप्रा आज केवळ देशातच नाही, तर परदेशातही आपल्या अभिनयाचा डंका वाजवत वाजवत आहे. प्रियांकाने आपल्या आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. निक जोनास आणि प्रियांका केवळ बी-टाउनच नव्हे, तर ग्लोबल फिल्म इंडस्ट्रीमधीलही हे एक फेमस कपल आहे. महत्वाचे म्हणजे, हे दोघेही सोशल मीडियावर जबरदस्त अॅक्टिव्ह असतात. आपल्या व्हॅकेशनचे व्हिडिओ आणि फोटोही शेअर करत असतात. यातच, निक आणि प्रियांका यांचा आणखी एक व्हिडिओ सामोर आला आहे. या व्हिडिओमध्ये, पत्नीशिवाय आपली काय स्थिती होते आणि पत्नी असताना काय असते? यासंदर्भात निक सांगताना दिसत आहे.

निक-प्रियांकाचा लिप-लॉप व्हिडिओ व्हायरल -
निक जोनासने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ त्यांच्या व्हॅकेशनचा असल्याचे दिसते. या व्हिडिओमध्ये निक एका सुंदर अशा समुद्रकिनाऱ्यावर दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तो आपल्या एक्सप्रेशन्सच्या माध्यमाने, पत्नी प्रियांका शिवाय त्याची काय अवस्था होते, तो तिच्या शिवाय अत्यंत उदास दिसतो, हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. याच वेळी, अचानक प्रियांका धावत येते आणि निकला निकला मिठी मारते. दरम्यान निक आणि प्रियांका एकमेकांना 'लिप-लॉक' करतात.

ब्लॅक बिकिनीमध्ये फारच ग्लॅमरस दिसतेय प्रियांका -
निक जोनास आणि प्रियांका चोप्राचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. चाहते या कपलचे कौतुक करताना दिसत आहेत. प्रियांकाच्या व्हिडिओमधील लूक संदर्भात बोलायचे झाल्यास, तिने काळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. तसेच, निक जोनास देखील आपल्या लेडी लव्हसोबत काळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना निकने कॅप्शनमध्ये, 'मी सोडून शकत नाही,' असे लिहिले आहे.


महत्वाचे म्हणजे, प्रियांका चोप्रा आपल्या अपकमिंग मूव्ही एसएसएमबी 29 संदर्भात चर्चेत आहे. या चित्रपटात महेश बाबू आणि आर माधवन सारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

Web Title: priyanka chopra and nick jonas lip lock VIDEO romantic look seen on the beach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.