प्रियंका चोप्राची लाडकी लेक मालतीची इन्स्टाग्रामवर Entry, आतापर्यंत शेअर केल्यात 19 पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 14:00 IST2024-08-30T14:00:28+5:302024-08-30T14:00:52+5:30
सध्या प्रियंका बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवतेय. जगभरात तिचा मोठा चाहता वर्गही आहे. प्रियंकाची लेक मालतीचीही चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे.

प्रियंका चोप्राची लाडकी लेक मालतीची इन्स्टाग्रामवर Entry, आतापर्यंत शेअर केल्यात 19 पोस्ट
Malti Marie on Instagram : देसी गर्ल' प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) ही कायमच चर्चेत असते. सध्या प्रियंका बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवतेय. जगभरात तिचा मोठा चाहता वर्गही आहे. प्रियंकाची लेक मालतीचीही चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. तिचे फोटो समोर आले की लगेचच व्हायरल होतात. आता तिची मुलगी मालती मेरीच्या संदर्भात एक नवीन अपडेट समोर येत आहे. तिने इन्स्टाग्रामवर ग्रँड एन्ट्री केली आहे.
प्रियंका ही नुकतीच ती तिच्या भावाच्या एंगेजमेंटसाठी भारतात आली होती. ती एक ग्लोबल स्टार आहे. निक जोनससोबत लग्न केल्यापासून प्रियंकाचं तिच्या घरावर आणि कुटुंबावर पूर्ण लक्ष असतं. ती चित्रपटांच्या शूटिंगदरम्यानही मुलगी मालतीला स्वतःपासून दूर ठेवत नाही आणि तिची पूर्ण काळजी घेते. प्रियंकाप्रमाणे तिची मुलगीदेखील सोशल मीडियावर अनेकदा दिसते. आता मालती मेरीचे सोशल मीडियावर अधिकृत खातेही तयार झाले आहे. ही बातमी समजल्यानंतर चाहते खूप उत्साहित झाले आहेत आणि मालतीच्या अकाऊंटला सपोर्ट करत आहेत. मालतीची फॅन फॉलोइंग अल्पावधीतच वाढताना दिसून येत आहे.
प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर मालतीचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती बेडवर स्टाईलमध्ये पडली आहे. यावर प्रियांकाने ही स्टोरी तिला टॅग केली आहे. स्वतः प्रियांका चोप्रादेखील तिच्या मुलीचे अकाऊंट फॉलो करते. मालतीचे हे खाते खासगी असून, ते अद्याप सार्वजनिक करण्यात आलेले नाही. मालतीला अनेकांनी फॉलो केले आहे. यामध्ये १९ पोस्ट करण्यात आल्या असून २० जणांना फॉलो करण्यात आले आहे. मालतीच्या डीपीमध्ये ती आनंदाने हसताना दिसत आहे. मालतीचे फॉलोअर्स ज्या वेगाने वाढत आहेत, ते पाहता ती तिच्या आईप्रमाणे लाखो फॉलोअर्स मिळवण्यात यशस्वी होईल.