"मला त्याचं शिक्षण काढायचं नव्हतं...", प्रियदर्शन यांनी राजपाल यादववर केलेलं वक्तव्य, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 15:38 IST2026-03-11T15:37:49+5:302026-03-11T15:38:30+5:30
राजपालचं शिक्षण कमी पडत असल्याचं वक्तव्य दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी केलं होतं. त्यावर राजपाल नाराज झाला होता. मात्र आता प्रियदर्शन यांनी त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

"मला त्याचं शिक्षण काढायचं नव्हतं...", प्रियदर्शन यांनी राजपाल यादववर केलेलं वक्तव्य, म्हणाले...
अभिनेता राजपाल यादव चेक बाऊन्सप्रकरणी काही दिवस तिहार तुरुंगात होता. त्याच्यावर ९ कोटींचं कर्ज होतं. बऱ्याचदा चेक बाऊन्स झाल्याने कोर्टाने त्याला शिक्षा सुनावली होती. राजपालच्या मदतीसाठी इंडस्ट्री धावून आली. अनेकांनी त्याला मदत करण्याची तयारी दर्शवली. यानंतर काही पेसै भरल्यानंतर कोर्टाने त्याला १८ मार्चपर्यंत अंतरिम जामीन दिला. सोनू सूदने राजपालकडे काम नाही अशी खंत व्यक्त केली होती. तर या व्यवहारांमध्ये राजपालचं शिक्षण कमी पडत असल्याचं वक्तव्य दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी केलं होतं. त्यावर राजपाल नाराज झाला होता. मात्र आता प्रियदर्शन यांनी त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
एचटी सिटीशी बोलताना प्रियदर्शन म्हणाले, "मला असं म्हणायचं होतं की राजपाल निरागस आहे. मला त्याच्या शिक्षणावर बोलायचं नव्हतं. माझा तसा अर्थच नव्हता. शिक्षण ही अशी गोष्ट आहे जी आपण पुस्तकातून शिकतो आणि काही अनुभवातूनही शिकतो. माझा म्हणण्याचा अर्थ राजपालच्या स्ट्रीट स्मार्टनेसशी होता. व्यावहारिक जागरुकता साध्या माणसांमध्ये कमी असते."
ते पुढे म्हणाले, "राजपाल कदाचित ग्रामीण भागातून आले आहेत आणि गावची माणसं इतकी निष्पाप असतात की त्यांना जगातील कपट लवकर समजत नाही. मात्र, चित्रपटसृष्टीसारख्या ठिकाणी वावरताना तुम्हाला चांगल्या आणि वाईट व्यक्तींमधील फरक ओळखता येणे आवश्यक असते. प्रियदर्शन यांनी ठामपणे सांगितले की, राजपाल यांचा अपमान करण्याचा किंवा त्यांना नीचा दाखवण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता. उलट, त्यांनी कबूल केले की आपल्या आयुष्यात त्यांनी राजपाल यादव यांच्यासारखा निरागस माणूस पाहिला नाही आणि अशी निरागसता बऱ्याचदा व्यावहारिक शिक्षणाच्या अभावामुळेच टिकून राहते."