पंतप्रधान मोदींनी रकुल प्रीत-जॅकी भगनानी या नवविवाहित दाम्पत्याला पत्राद्वारे दिल्या शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 12:19 IST2024-02-23T12:17:05+5:302024-02-23T12:19:41+5:30

पंतप्रधान मोदींनी अभिनेता जॅकी भगनानी आणि अभिनेत्री रकुल प्रीत यांना लिहिलं पत्र, पाहा काय-काय म्हटलं यात

Prime Minister Modi congratulated the newly married couple Rakul Preet-Jackie Bhagnani through a letter | पंतप्रधान मोदींनी रकुल प्रीत-जॅकी भगनानी या नवविवाहित दाम्पत्याला पत्राद्वारे दिल्या शुभेच्छा!

पंतप्रधान मोदींनी रकुल प्रीत-जॅकी भगनानी या नवविवाहित दाम्पत्याला पत्राद्वारे दिल्या शुभेच्छा!

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता जॅकी भगनानी आणि अभिनेत्री रकुल प्रीत हे मंगळवार २१ फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांनी गोव्यात लग्नगाठ बांधली. त्यांनी आनंद कारज पद्धतीने लग्न केलं आहे.  त्याचे लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. रकुल-जॅकीच्या लग्नसोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. बॉलिवूडसोबतच या जोडप्यानं पीएम मोदींनाही आमंत्रित केलं होतं.  नवविवाहित जोडप्याला पंतप्रधानांनी अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. निमंत्रणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे पत्रही त्यांनी लिहिलं आहे.

रकुल आणि जॅकी भगनानीने सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींचे पत्र शेअर केलं आहे. मोदींनी पत्रात लिहलं, 'जॅकी आणि रकुल यांच शुभप्रसंगी खूप खूप अभिनंदन. जोडप्यासाठी येणारे वर्ष आनंदाचे जावो. या जोडप्यासाठी येणारे वर्ष आनंदाचे जावो. मला कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. नवविवाहित जोडप्याचे पुन्हा एकदा अभिनंदन'.

रकुलनेही मोदींचे पत्र शेअर करत लिहिलं की, "माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे खूप खूप आभार. तुमचे आशीर्वाद आमच्यासाठी खूप खास आहेत''. तर यासोबतच जॅकीच्या बाजूनेही प्रतिक्रिया देण्यात आली आहे. त्याने लिहिले, 'पंतप्रधानांचे खूप खूप आभार. तुम्ही आमच्या नवीन प्रवासाला आशीर्वाद दिलात, तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे'. रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांचं गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग झालं आहे. आता ते मुंबईमध्ये रिसेप्शन देणार असल्याचं बोललं जातं आहे. 

Web Title: Prime Minister Modi congratulated the newly married couple Rakul Preet-Jackie Bhagnani through a letter