प्रीती झिंटानं शेअर केला नवऱ्यासोबतचा रोमँटिक पोस्ट, १० वर्षांनी लहान असलेल्या पतीवर केला प्रेमाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 14:13 IST2026-03-12T14:12:04+5:302026-03-12T14:13:36+5:30
प्रीतीने नवऱ्यासाठी सोशल मीडियावर एक अत्यंत रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे.

प्रीती झिंटानं शेअर केला नवऱ्यासोबतचा रोमँटिक पोस्ट, १० वर्षांनी लहान असलेल्या पतीवर केला प्रेमाचा वर्षाव
Preity Zinta : बॉलिवूडची 'डिंपल गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे प्रीती झिंटा.अभिनेत्रीने तिचा दमदार अभिनय आणि परफॉर्मन्सच्या आधारावर चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या गालावरच्या खळीचे तर आजही लाखो दिवाने आहेत. प्रीती झिंटा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ११ मार्च रोजी प्रीतीचा पती जीन गुडइनफ याचा वाढदिवस होता. या खास दिवशी प्रीतीने नवऱ्यासाठी सोशल मीडियावर एक अत्यंत रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे.
प्रितीनं सोशल मीडियावर नवऱ्यासोबतचा फोटो पोस्ट करत त्याच्यावरचं प्रेम व्यक्त केलंय. तिनं लिहलं, "माझ्या जग ज्याच्या भोवती फिरतं, माझ्या आयुष्याचं केंद्र, माझ्या पखांना बळ देणारा आणि ढगाळ आकाशातही माझ्यासाठी कायम प्रकाशाची एक किरण ठरणाऱ्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वात उत्तम वडील, सर्वोत्तम नवरा आणि माझा जिवलग मित्र असल्याबद्दल तुझे खूप आभार.... तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे", या शब्दात प्रितीनं नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.
प्रीती झिंटाने २९ फेब्रुवारी २०१६ रोजी अमेरिकेतील आर्थिक विश्लेषक जीन गुडइनफशी लग्न केले होते. लग्नाच्या २ वर्षांनंतर, तिने सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला, ज्यांची नावे जिया आणि जय अशी आहेत. प्रीती झिंटाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती 'लाहोर १९४७' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती सनी देओलसोबत स्क्रिन शेअर करताना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या १३ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येतंय. या सिनेमाची कथा असगर वजाहत यांच्या 'Jis Lahore Nai Dekhya O Jamyai Nai' या नाटकावर आधारित आहे.