प्रिती झिंटाने शेअर केला थ्रोबॅक फोटो, म्हणाली- आखिर हाथी क्या सोच रहे होंगे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 17:01 IST2021-01-16T16:57:37+5:302021-01-16T17:01:30+5:30
प्रितीने शेअर केलेला हा फोटो इंटरनेटवर तूफान व्हायरल होतो आहे.

प्रिती झिंटाने शेअर केला थ्रोबॅक फोटो, म्हणाली- आखिर हाथी क्या सोच रहे होंगे?
बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा अनेक हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे. प्रितीच्या हिट सिनेमांपैकी एक शाहरुख खानसोबतचा 'दिल से' होता. अनेक वर्षांनंतर या सिनेमा संबंधित प्रितीने एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर तिने एक मजेदार कॅप्शन लिहिले आहे, जे चाहत्यांना चांगलेच आवडले आहे. प्रितीचा हा फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या फोटोत प्रिती 'जिया जले' गाण्याचे शूटिंग करते आहे. ती पोज देत आहे आणि तिच्या मागे अनेक हत्ती उभे आहेत. हा फोटो शेअर करत प्रितीने लिहिले आहे की , 'हत्ती सुद्धा हाच विचार करत असतील की मी काय करते आहे ? एका चांगल्या मुलीप्रमाणे मी पण तेच करत आहे जे फराह खान मला सांगत आहे. 'दिल से' च्या शूटिंगची ही सर्वात आवडती पोज आहे. #Jiyajale #Dilse #flashbackfriday'
आज प्रिती बॉलिवूडमध्ये फार अॅक्टिव्ह नाही. बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेपासून दूर पतीसोबत लॉस एंजेलिसमध्ये राहते आहे. ती शेवटची 2018 मध्ये 'भैया जी सुपरहिट' मध्ये दिसली होती, ज्यामध्ये सनी देओल देखील होता.