Preity Zinta : आमची मुंबई ! अभिनेत्री प्रिती झिंटाचे मुंबई दर्शन; हृतिकच्या एक्स वाईफसोबत बोटीने फेरफटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 13:52 IST2022-12-12T13:50:55+5:302022-12-12T13:52:41+5:30

बॉलिवुडची डिंपल क्वीन 'प्रिती झिंटा' बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यावरुन गायब आहे. तर मुंबईत परतल्याचा आनंद तिने व्यक्त केला आहे.

preity-zinta-back-in-mumbai-visits-siddhivinayak-temple-gateway-of-india-with-hririks-ex-wife-suzzane-khan | Preity Zinta : आमची मुंबई ! अभिनेत्री प्रिती झिंटाचे मुंबई दर्शन; हृतिकच्या एक्स वाईफसोबत बोटीने फेरफटका

Preity Zinta : आमची मुंबई ! अभिनेत्री प्रिती झिंटाचे मुंबई दर्शन; हृतिकच्या एक्स वाईफसोबत बोटीने फेरफटका

Preity Zinta : बॉलिवुडची डिंपल क्वीन 'प्रिती झिंटा' बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यावरुन गायब आहे. ती सध्या तिच्या कुटुंबाला जास्त वेळ देत आहे. प्रिती तिच्या कुटुंबासोबत लॉस एंजिलिस कॅलिफोर्निया इथे राहते. प्रिती सोशल मीडियावर खुप सक्रिय असते. नुकतेच तिने मुंबईत फेरफटका मारतानाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. मुंबईत परतल्याचा आनंद तिने व्यक्त केला आहे.

हृतिकच्या एक्स वाईफ सोबत केले मुंबई दर्शन 

प्रिती झिंटा काही दिवसांसाठी मुंबईत असून ती मुंबई दर्शनाचा आनंद घेताना दिसत आहे. सोबत तिची बेस्ट फ्रेंड हृतिक रोशनची एक्स वाईफ सुझेन खानही आहे. गेटवे ऑफ इंडिया येथे संध्याकाळच्या वेळी बोटीतून फेरफटका मारतानाचा फोटो आणि व्हिडिओ तिने इंन्टाग्रामवर पोस्ट केले आहे. 

तर २ दिवसांपूर्वी तिने सिद्धिविनायकाचेही दर्शन घेतले. अनेक दिवसांनी सिद्धिविनायक मंदिरात आरती करण्याचे भाग्य लाभले. मनाला शांत वाटले असे कॅप्शन लिहित तिने व्हिडिओ पोस्ट केला आहे.

प्रिती झिंटा चित्रपटांत दिसत नसली तरी ती एक बिझनेस वुमन आहे. आयपीएलच्या किंग्स इलेवन पंजाब टीमची ती मालकिण आहे. प्रितीने मागील वर्षी सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. 

Web Title: preity-zinta-back-in-mumbai-visits-siddhivinayak-temple-gateway-of-india-with-hririks-ex-wife-suzzane-khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.