वयाच्या १९ व्या वर्षीच ड्रग्सच्या आहारी गेला 'हा' अभिनेता; सावत्र आईमुळे वडिलांपासून झाला दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 15:21 IST2023-11-28T15:21:04+5:302023-11-28T15:21:27+5:30
Bollywood actor: या अभिनेत्याची सावत्र आईदेखील अभिनेत्रीच आहे.

वयाच्या १९ व्या वर्षीच ड्रग्सच्या आहारी गेला 'हा' अभिनेता; सावत्र आईमुळे वडिलांपासून झाला दूर
बॉलिवूड अभिनेता प्रतिक बब्बर (Prateik babbar) त्याच्या फिटनेस आणि पर्सनल आयुष्यामुळे बऱ्याचदा चर्चेत येत असतो. प्रतिक अभिनेता राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा लेक आहे. त्यामुळे आई-वडिलांच्या नावानेही तो ओळखला जातो. आई-वडील दिग्गज कलाकार असतानाही प्रतिकला इंडस्ट्रीत बराच स्ट्रगल करावा लागला आहे. केवळ इंडस्ट्रीच नाही तर खऱ्या आयुष्यातही त्याने अनेक खस्ता खाल्ल्या. कमी वयात व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे त्याचे आयुष्य जवळपास उद्धवस्त झालं होतं. मात्र, वेळीच त्याने सावरलं. त्यामुळे त्याच्या खासगी आयुष्यातील चढउतारांवर एक प्रकाश टाकुयात.
एका मुलाखतीमध्ये प्रतिकने त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. या मुलाखतीमध्ये त्यान त्या आवडत्या गोष्टींविषयी, त्याच्या पॅशनविषयी भाष्य केलं. सोबतच त्याच्या ड्रग्सच्या व्यसनांविषयीदेखील तो व्यक्त झाला होता.
प्रतिकने वयाच्या १९ व्या वर्षापासून करिअरला सुरुवात केली होती. या वयात असताना त्याने अनेक ब्रँडच्या जाहिरातींमध्ये काम केलं होतं. परंतु, याच वयात तो व्यसनांच्या आहारी गेला होता. शाळेत असताना तो ड्रग्सचं सेवन करु लागला होता. मात्र, अथक प्रयत्न करुन त्याने हे व्यसन सोडवलं.
दरम्यान, प्रतिक लहान असतानाच त्याचं आईचं छत्र हरपलं. प्रतिकला जन्म दिल्यानंतर स्मिता पाटील यांचं निधन झालं. त्यामुळे प्रतिकला आईचं प्रेम मिळालं नाही. स्मिता पाटील यांच्या निधनानंतर राज बब्बर यांनी अभिनेत्री नादिरा हिच्यासोबत दुसरा संसार थाटला. परंतु, वडिलांच्या दुसऱ्या लग्नामुळे प्रतिक आणि राज यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला.