'कर्नाटक निवडणुकीत मतांसाठी…', 'द केरला स्टोरी'वरुन प्रकाश राज यांनी मोदी सरकारवर साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 14:09 IST2023-05-20T14:08:08+5:302023-05-20T14:09:14+5:30
The Kerala Story : प्रकाश राज यांनी द केरला स्टोरी चित्रपटाबाबत केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

'कर्नाटक निवडणुकीत मतांसाठी…', 'द केरला स्टोरी'वरुन प्रकाश राज यांनी मोदी सरकारवर साधला निशाणा
सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'द केरला स्टोरी' (The Kerala Story) चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच या चित्रपटावर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. काहींनी तर हा चित्रपट प्रोपगंडा असल्याचे म्हटले आहे. तसेच काही ठिकाणी या चित्रपटावर बंदीही घालण्यात आली होती. दरम्यान आता बॉलिवूड अभिनेता प्रकाश राज (Prakash Raj) यांनी द केरला स्टोरीवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज सोशल मीडियावर सक्रिय आहेत आणि समाजातील अनेक घडामोडींवर ते सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसतात. प्रकाश राज यांनी नुकतेच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन द केरला स्टोरी चित्रपटाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, प्रिय सुप्रीम लीडर, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी काल्पनिक प्रपोगांडा असलेल्या या चित्रपटाचं प्रमोशन करुन त्याचा वापर करण्यामागे तुमचा काय विचार होता? Just Asking. प्रकाश राज यांच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अदा शर्माच्या द केरला स्टोरी चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. हा चित्रपट पहिल्या दिवसापासूनच कोटींची कमाई करत आहे. या चित्रपटाने १५ दिवसांत १६७.८६ कोटींचा बिझनेस केला आहे.