वयाच्या 50 व्या वर्षी Prabhu Deva झाला चौथ्यांदा बाबा; दुसऱ्या पत्नीने दिला गोंडस बाळाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 17:19 IST2023-06-12T17:15:49+5:302023-06-12T17:19:04+5:30

Prabhu deva: प्रभूदेवाला पहिल्या पत्नीपासून तीन मुलं आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा तो बाबा झाला आहे.

prabhu deva second wife himani singh gave birth to a baby girl | वयाच्या 50 व्या वर्षी Prabhu Deva झाला चौथ्यांदा बाबा; दुसऱ्या पत्नीने दिला गोंडस बाळाला जन्म

वयाच्या 50 व्या वर्षी Prabhu Deva झाला चौथ्यांदा बाबा; दुसऱ्या पत्नीने दिला गोंडस बाळाला जन्म

साऊथसह बॉलिवूडलाही आपल्या नृत्यकौशल्याच्या तालावर नाचायला भाग पाडणारा कोरिओग्राफर, अभिनेता म्हणजे प्रभूदेवा (Prabhu deva). आपल्या डान्समुळे अनेकांना वेड लावणारा प्रभू देवा वयाच्या ५० व्या वर्षी बाबा झाला आहे. प्रभू देवाच्या दुसऱ्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. 

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्रभूदेवाने स्वत: चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली आहे. मुलीच्या आगमनामुळे खूश असलेला प्रभूदेवा चौथ्यांना बाबा झाला आहे. यापूर्वी त्याला पहिल्या पत्नीपासून तीन मुलं आहे. मात्र, पहिल्यांदाच घरात मुलीचं आगमन झाल्यामुळे तो कमालीचा खूश असल्याचं त्याने शेअर केलेल्या पोस्टमधून दिसून येत आहे.

"मी बाबा झालोय हे खरं आहे. या वयात बाबा झाल्यामुळे मी खूप आनंदी आहे. कुटुंब पूर्ण झाल्याचा जो आनंद असतो तो फार वेगळाच असतो," असं प्रभू देवाने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसंच मुलीसोबत जास्तीत जास्त वेळ घालावता यावा यासाठी कामाचा व्यापही कमी केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
"मी माझं काम आता थोडं कमी केलं आहे. मला असं वाटतंय मी सतत खूप काम करतो. सतत धावत असतो. पण, आता काम खूप झालं. मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे."

दरम्यान, प्रभू देवाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फारसा कधीच व्यक्त होत नाही. २०२० मध्ये प्रभू देवाने गुपचूप पद्धतीने दुसरं लग्न केलं. परंतु, दुसरी पत्नी हिमानी सिंग हिच्यासोबत तो बालाजीच्या दर्शनाला आला असता त्याच्या दुसऱ्या लग्नाविषयीचं सत्य समोर आलं. हिमानी ही डॉक्टर असल्याचं सांगण्यात येतं. प्रभू देवाने १९९५ मध्ये रामलता हिच्यासोबत लग्न केलं होतं. मात्र, लग्नाच्या १६ वर्षानंतर त्यांचा संसार मोडला. ते कायदेशीररित्या विभक्त झाले. प्रभू देवा आणि रामलता यांनी तीन मुलं आहेत.

Web Title: prabhu deva second wife himani singh gave birth to a baby girl