बियॉन्सेच्या तालावर थिरकणार ‘बाहुबली’ प्रभास!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 15:13 IST2019-01-18T15:10:36+5:302019-01-18T15:13:04+5:30
‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ या प्रभासच्या दोन्ही चित्रपटांना इतके यश मिळाले की, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अगदी रेकॉर्डबे्रक कमाई केली. या दोन्ही चित्रपटानंतर चाहते प्रभासचा आगामी चित्रपट ‘साहो’कडे डोळे लावून बसले आहेत.

बियॉन्सेच्या तालावर थिरकणार ‘बाहुबली’ प्रभास!!
‘बाहुबली’च्या अभूतपूर्व यशानंतर प्रभास चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ या प्रभासच्या दोन्ही चित्रपटांना इतके यश मिळाले की, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अगदी रेकॉर्डबे्रक कमाई केली. या दोन्ही चित्रपटानंतर चाहते प्रभासचा आगामी चित्रपट ‘साहो’कडे डोळे लावून बसले आहेत. तूर्तास या चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे. ही बातमी ऐकून चाहत्यांची उत्कंठा आणखी शिगेला पोहोचेल, हे मात्र नक्की.
होय, ‘साहो’मध्ये प्रभास प्रेक्षकांना एंटरटेनमेंटचा डबलडोज देणार आहे. या चित्रपटातील एका गाण्याचा थेट संबंध हॉलिवूड सिंगर बियॉन्सेशी आहे.
थांबा...थांबा...बियॉन्से या चित्रपटात दिसेल, असा तुमचा अंदाज असेल तर तसे नाही. पण बियॉन्सेची सुपरहिट गाणी मात्र यात असणार आहेत. होय, जगात लोकप्रीय असलेल्या बियॉन्सेच्या सुपरहिट गाण्यांवर प्रभास थिरकताना दिसणार आहे. बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार,‘साहो’च्या एका गाण्याचे चित्रीकरण लवकरच होणार आहे. यासाठी एक भव्य सेट साकारला जातोय. हा डान्स नंबर कार्निव्हल थीमवर आधारित असेल. साहजिकचं यासाठी ब्राझिलचे स्पेशल डान्सर्स बोलवण्यात आले आहे. वैभवी मर्चंट या गाण्याची कोरिओग्राफी करणार आहे. बियॉन्सेच्या ‘ब्लो’ आणि ‘जेलेस’ ही गाणी या डान्स ट्रॅकचा भाग असतील. एकंदर काय तर प्रभास आणि बियॉन्सेच्या चाहत्यांना एक धम्माल ट्रिट मिळणार...
‘साहो’बद्दल सांगायचे तर यात प्रभासशिवाय श्रद्धा कपूर,नील नितीन मुकेश, चंकी पांडे, मंदिरा बेदी असे अनेक कलाकार आहेत.‘साहो’मध्ये श्रद्धा डबलरोल साकारताना दिसणार आहे. केवळ इतकेच नाही तर प्रभासच्या तोडीला तोड असे अॅक्शन सीन्स करतानाही दिसणार आहे. एमी जैक्सन, अरूण विजय आणि आदित्य श्रीवास्तव सारखे कलाकारही यात महत्त्वपूर्ण भूमिका वठवणार आहेत. ‘साहो’नंतर प्रभास लगेच दिग्दर्शक के के राधा कृष्ण कुमार यांच्या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट युव्ही क्रिएशन आणि गोपीकृष्ण मुव्हीज प्रोड्यूस करणार आहे.