Adipurush Release Date: सुपरस्टार प्रभासच्या आदिपुरुषची रिलीज डेट जाहीर; बहुचर्चित चित्रपट 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 12:07 IST2022-03-01T12:07:07+5:302022-03-01T12:07:42+5:30

Adipurush: प्रभासने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आदिपुरुषची रिलीज डेट सांगितली आहे.

prabhas starrer adipurush release date aannouced today | Adipurush Release Date: सुपरस्टार प्रभासच्या आदिपुरुषची रिलीज डेट जाहीर; बहुचर्चित चित्रपट 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

Adipurush Release Date: सुपरस्टार प्रभासच्या आदिपुरुषची रिलीज डेट जाहीर; बहुचर्चित चित्रपट 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (prabhas)  याच्या प्रत्येक चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. यात त्याचा आगामी 'आदिपुरुष' (adipurush) हा चित्रपट तर बहुचर्चित आणि बहुचर्चित ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांची हिच उत्सुकता लक्षात घेता अखेर प्रभासने आदिपुरुषची रिलीज डेट जाहीर केली आहे. महाशिवरात्रीचं निमित्त साधत त्याने एक पोस्ट शेअर करत हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे सांगितलं आहे.

'आदिपुरुष' या चित्रपटात प्रभाससोबत अभिनेत्री क्रिती सेनॉनदेखील स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता कमालीची वाढली होती. मात्र, आता ही प्रतीक्षा संपुष्टात आली आहे.  हा चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कोणत्या दिवशी प्रदर्शित होणार 'आदिपुरुष'

प्रभासने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आदिपुरुषची रिलीज डेट सांगितली आहे. त्यानुसार, १२ जानेवारी २०२३ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा 3D चित्रपट असून त्याचं दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं आहे. तसंच ओम राऊत यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुनही याची माहिती दिली आहे.

दरम्यान,  यापूर्वी आदिपुरुष ११ ऑगस्ट २०२२ मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, त्याचवेळी आमिर खानचा लाल सिंह चड्ढादेखील प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात होतं. त्यामुळे आदिपुरुषची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. विशेष म्हणजे आदिपुरुष हा बिग बजेट चित्रपट आहे. जवळपास ४०० कोटी रुपये या चित्रपटाचं बजेट असल्याचं सांगण्यात येतं. या चित्रपटात प्रभास, श्री रामाचंद्राची भूमिका साकारणार आहे. तर क्रिती सेनॉन जानकीची भूमिका साकारणार आहे. 
 

Web Title: prabhas starrer adipurush release date aannouced today