Prabhas and Kriti Sanon : सिद्धार्थ-कियारा नंतर प्रभास-क्रिती करणार डेस्टिनेशन एन्गेजमेंट? ‘ते’ ट्वीट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 18:11 IST2023-02-07T18:10:17+5:302023-02-07T18:11:48+5:30
Prabhas and Kriti Sanon : प्रभास व क्रिती दोघंही काहीही बोलायला तयार नाहीत. पण हो, चर्चा जोरात आहे आणि आता हे कपल डेस्टिनेशन एन्गेजमेंट करणार असल्याचं म्हटलं जात आहे...

Prabhas and Kriti Sanon : सिद्धार्थ-कियारा नंतर प्रभास-क्रिती करणार डेस्टिनेशन एन्गेजमेंट? ‘ते’ ट्वीट चर्चेत
सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी आज लग्नबंधनात अडकले. आता या जोडप्यानंतर बॉलिवूडचं आणखी एक जोडपं आपल्या नात्याला ऑफिशिअल करणार असल्याचं कळतंय. हे जोडपं कोण तर साऊथ सुपरस्टार प्रभास (Prabhas)आणि बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅनन (Kriti Sanon). गेल्या अनेक दिवसांपासून क्रिती व प्रभासच्या डेटींगच्या चर्चा आहेत. प्रभास व क्रिती दोघंही यावर काहीही बोलायला तयार नाहीत. पण हो, चर्चा जोरात आहे आणि आता हे कपल डेस्टिनेशन एन्गेजमेंट करणार असल्याचं म्हटलं जात आहे. ओवरसीज फिल्म सर्टिफिकेशन बोर्डाचे सदस्य व चित्रपट समीक्षक उमैर संधू यांनी एक ट्विट करत तसा दावा केला आहे.
BREAKING NEWS: #KritiSanon & #Prabhas will get engaged next week in Maldives 🇲🇻!! So Happy for them.
— Umair Sandhu (@UmairSandu) February 5, 2023
उमैर संधू यांनी क्रिती आणि प्रभासच्या साखरपुड्याबद्दल एक ट्वीट केलं आहे. “ब्रेकिंग न्यूज: क्रिती सॅनान आणि प्रभास यांचा पुढील आठवड्यात मालदीवमध्ये साखरपुडा होणार आहे. मी त्या दोघांसाठी खूप खुश आहे”, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. सध्या हे ट्विट तुफान व्हायरल होतंय. क्रिती व प्रभासचे चाहते क्रेझी झाले आहेत. अर्थात क्रिती वा प्रभास कडून याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
‘भेडिया’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान क्रितीने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये तिने प्रभाससोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हापासून क्रिती व प्रभासच्या अफेअरची चर्चा सुरू झाली होती.
लवकरच प्रभास आणि क्रिती एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष या चित्रपटात प्रभास रामाच्या तर क्रिती सीतेच्या भूमिकेत दिसेल. काही महिन्यांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. पण त्यात दाखवलेल्या काही दृश्यांमुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला. या चित्रपटात दिल्या गेलेल्या व्हीएफएक्सवर टीका करण्यात आली. त्यानंतर आता या चित्रपटातील दृश्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय मेकर्सनी घेतला आहे. आता हा चित्रपट १६ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.