Anushka Shetty सोबत पुन्हा रोमान्स करणार प्रभास, जाणून घ्या सिनेमाचं नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 15:45 IST2022-04-01T15:43:57+5:302022-04-01T15:45:08+5:30
Prabhas and Anushka Shetty : साऊथमधील प्रसिद्ध दिग्दर्शक मारूती दसारी 'राजा डीलक्स' नावाचा सिनेमा बनवत आहे. ज्यात प्रभास आणि अनुष्का रोमान्स करताना दिसणार आहे.

Anushka Shetty सोबत पुन्हा रोमान्स करणार प्रभास, जाणून घ्या सिनेमाचं नाव
प्रभास (Prabhas) आणि अनुष्का शेट्टी (Anushka Shetty) यांचा सिनेमा 'बाहुबली' चर्चा आजही होते. यात दोघांची केमिस्ट्री खूप पसंत केली गेली होती. या सिनेमानंतर दोघांना पुन्हा एकत्र बघण्यासाठी फॅन्स आतुर झाले आहेत. अशात दोघांच्याही फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. ही सुपरहिट जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, साऊथमधील प्रसिद्ध दिग्दर्शक मारूती दसारी 'राजा डीलक्स' नावाचा सिनेमा बनवत आहे. ज्यात प्रभास आणि अनुष्का रोमान्स करताना दिसणार आहे.
असं सांगितलं जात आहे की, राजा डीलक्स हा सिनेमा एक हॉरर-कॉमेडी सिनेमा असणार आहे. राजा डीलक्सच्या शूटिंगसाठी दिग्दर्शकांनी ५० दिवसांचे दोन शेड्युल ठरवले आहेत. म्हणजे शूटिंग ५० दिवसात पूर्ण होणार आहे. हा सिनेमा सर्वच वर्गातील प्रेक्षकांसाठी असणार आहे.
प्रभास आणि अनुष्कासोबतच या सिनेमा मालविका मोहनन आणि श्रीलाला या दोघीही दिसणार आहेत. हा सिनेमा 'आदिपुरूष'च्या आधीच रिलीज होणार असल्याचं बोललं जात आहे. सध्या या सिनेमाच्या पोस्ट प्रॉडक्शनचं काम सुरब आहे. लवकरच प्रभास राजी डीलक्स सिनेमाचं शूटिंग सुरू करणार आहे.
राजा डीलक्समध्ये प्रभास आणि अनुष्का एकत्र दिसणार असल्याने त्यांचे फॅन्स फारच आनंदी आहे आणि त्यांना या सिनेमाबाबतचे सगळे अपडेट्स जाणून घेण्याची उत्सुकता आहे. दरम्यान आधी प्रभास आणि अनुष्काच्या अफेअरीच आणि मग लग्नाची चर्चा जोरदार रंगली होती. पण नंतर ती अफवा निघाली. काही दिवसांपूर्वी अशीही चर्चा सुरू होती की, दोघे बोलत नाहीत. पण दोघे या सिनेमासाठी एकत्र आले तर ही चर्चाही अफवा ठरेल.