सही पकड़े हैं..! कंडोम कंपनीने विकी-कतरिनासाठी शेअर केलेली पोस्ट झाली व्हायरल, वाचून पोट धरून हसाल....
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 15:22 IST2021-12-09T15:21:19+5:302021-12-09T15:22:14+5:30
Katrina Kaif-Vicky Kaushal Wedding:विकी कौशल आणि कतरिना कैफ आज राजस्थानमध्ये लग्नबेडीत अडकणार आहेत.

सही पकड़े हैं..! कंडोम कंपनीने विकी-कतरिनासाठी शेअर केलेली पोस्ट झाली व्हायरल, वाचून पोट धरून हसाल....
विकी कौशल आणि कतरिवा कैफ आज पती-पत्नी बनणार आहेत. आज ते दोघे राजस्थानमध्ये सात फेरे (Katrina Kaif-Vicky Kaushal Wedding) घेणार आहेत. यादरम्यान कंडोम कंपनी डुरेक्सने सोशल मीडियावर विकी (Vicky Kaushal) आणि कतरिनाच्या (Katrina Kaif) लग्नासंदर्भातील मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाही आहेत.
डुरेक्स कंपनीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, त्यात लिहिले की, प्रिय विकी आणि कतरिना जर आम्हाला नाही बोलवले तर खरंच ही मस्करी असेल. त्यांच्या या पोस्टवर मजेशीर कमेंट येत आहे. खरेतर विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी त्यांच्या लग्नाबद्दलचे सर्व डिटेल गुलदस्त्यात ठेवले आहेत. त्यांनी लग्नातदेखील मोजक्या पाहुण्यांना बोलवले आहे आणि यासोबत पाहुण्यांची यादीदेखील सीक्रेट ठेवली आहे. कदाचित यामुळे कंपनीने विकी आणि कतरिनाच्या लग्नाला घेऊन थट्टा केली. या पोस्टची सोशल मीडियावर खूप चर्चा होताना दिसते आहे.
डुरेक्स कंपनीच्या या पोस्टवर युजर्स कमेंट करून मजा घेत आहेत. एका युजरने लिहिले की, ओ भाईसाब.. तर दुसऱ्याने म्हटले की, जरा जास्तच पर्सनल होत आहे. तर आणखी एका युजरने म्हटले ती, हे लग्नातील सर्वात बेस्ट मीम आहे गुरू. यापूर्वीदेखील या कंपनीने विराट कोहली-अनुष्का शर्मा आणि दीपिका पादुकोण-रणवीर सिंगच्या लग्नाला घेऊनही अशी पोस्ट केली होती आणि ती खूप चर्चेत आली होती.