लोकप्रिय गायक झाला बाबा, पत्नीला झाली जुळी मुलं, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 12:28 IST2025-05-31T12:27:39+5:302025-05-31T12:28:49+5:30

सिनेसृष्टीतील लोकप्रिय गायक जुळ्या मुलांचा बाबा झाला आहे. त्याचं सर्वांनी अभिनंदन केलं आहे.

Popular singer milind gaba and wife priya blessed twins fans congratulate him | लोकप्रिय गायक झाला बाबा, पत्नीला झाली जुळी मुलं, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

लोकप्रिय गायक झाला बाबा, पत्नीला झाली जुळी मुलं, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

मनोरंजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर येतेय. प्रसिद्ध पंजाबी गायक - संगीतकार मिलिंद गाबा आणि त्याची पत्नी फॅशन व्लॉगर प्रिया बेनीवाल यांना जुळी मुलं झाली आहेत. ३० मे २०२५ रोजी मिलिंद आणि प्रिया यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी जुळी मुलं आहेत. या गुड न्यूजची घोषणा त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे केली, ज्यात त्यांनी लिहिले, "गाबाच्या कहाणीत ट्विस्ट नाही, ट्विन्स आहेत." अशाप्रकारे मिलिंदने त्याचा आनंद साजरा केलाय.

मिलिंद आणि प्रिया झाले आई-बाबा

मिलिंद आणि प्रिया यांनी पोस्टमध्ये एक सुंदर फोटो शेअर केला आहे, या फोटोंमध्ये निळ्या आणि गुलाबी कपड्यांमध्ये गुंडाळलेल्या दोन बाळांचे फोटो शेअर केले आहेत. प्रियाने हे फोटो पोस्ट करुन एक भावुक कॅप्शन लिहिलं आहे, "कधी स्वतःसाठी काही मागितलं नाही. पण आता आणखी काय मागू. आम्हाला दोन जादूई गोष्टींचा आशीर्वाद मिळाला आहे. जय माता दी." अशा शब्दात प्रियाने आणि मिलिंदने सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या आहेत.


प्रिया आणि मिलिंदने ही गुड न्यूज सोशल मीडियावर शेअर करताच त्यांच्या चाहत्यांनी आणि मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटींनी त्यांचं अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. कॉमेडियन भारती सिंग, गायिका तुलसी कुमार, आणि अभिनेत्री किश्वर मर्चंट या सेलिब्रिटींनी प्रिया-मिलिंदच्या पोस्टवर कमेंट करुन त्यांंचं अभिनंदन केलं आहे. मिलिंद गाबाने 'नजर लग जाएगी', 'शी डोंट नो'. आणि 'यार मोड दो' यांसारख्या हिट गाणी दिली आहेत. १६ एप्रिल २०२२ रोजी मिलिंदने प्रिया बेनीवालशी विवाह केला होता. दोघांच्या सुखी संसारात जुळ्या मुलांचं आगमन झाल्याने ते खूप आनंदी आहेत.

Web Title: Popular singer milind gaba and wife priya blessed twins fans congratulate him