शाहरुख खानच्या आधी 'या' अभिनेत्रीची मॅनेजर होती पूजा ददलानी, फराह खानचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 16:24 IST2025-10-06T16:23:50+5:302025-10-06T16:24:40+5:30
फराह खानने सांगितला 'तो' किस्सा

शाहरुख खानच्या आधी 'या' अभिनेत्रीची मॅनेजर होती पूजा ददलानी, फराह खानचा खुलासा
अभिनेता शाहरुख खानसोबत नेहमीच त्याची मॅनेजर पूजा ददलानी दिसते. बऱ्याच वर्षांपासून ती शाहरुख खानचं काम पाहत आहे. तसंच त्याच्या 'रेड चिलीज एंटरटेन्मेंट'चंही काम सांभाळत आहे. शाहरुख खान जिथे जिथे जातो तिथे पूजा ही मागे दिसतेच. चांगला, दु:खद कोणताही इव्हेंट असो शाहरुखसोबत त्याची बायको गौरी नाही तर मॅनेजर पूजा हीच कायम असते. पण तुम्हाला माहितीये का शाहरुख खानच्या आधी पूजा ददलानी एका प्रसिद्ध अभिनेत्रीची मॅनेजर होती. कोण आहे ती अभिनेत्री?
२००७ साली आलेल्या 'ओम शांती ओम' सिनेमाचं दिग्दर्शन फराह खानने केलं होतं. नुकतीच फराहने कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा यांना मुलाखत दिली. यावेळी फराह खानने 'ओम शांती ओम' सिनेमाचे काही बिहाईंड द सीन्स फोटो दाखवले आणि त्यासंबंधी आठवणी सांगितल्या. तेव्हा सेटवरील एका फोटोत दीपिका पादुकोणच्या मागे पूजा ददलानी बसली आहे. फराह खान सांगते, 'पूजा तेव्हा दीपिकाची मॅनेजर होती. सेटवर दीपिकाचे आईवडीलही आले होते. आम्ही त्यांच्यासोबत फोटो काढले होते'.
ओम शांती ओम २००७ साली आला होता. तर पूजा ददलानीने २०१२ साली शाहरुखची मॅनेजर म्हणून काम करायला सुरुवात केली. नंतर तिने प्रोडक्शन हाऊसचेही काम सुरु केले. आज तिला शाहरुखची मॅनेजर म्हणून १३ वर्ष झाली आहेत. शाहरुखचा मुलगा आर्यन खानला अटक झाली तेव्हाही पूजा त्याच्यासोबत कायम होती.