वयाच्या ५२ व्या वर्षी पूजा भट करणार दुसरं लग्न? म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 17:48 IST2024-04-05T17:47:00+5:302024-04-05T17:48:03+5:30

पूजाचे चाहते तिला कधी लग्न करणार आहे, असे प्रश्न विचारत असतात.

Pooja Bhatt reacts to people asking her to get married | वयाच्या ५२ व्या वर्षी पूजा भट करणार दुसरं लग्न? म्हणाली...

वयाच्या ५२ व्या वर्षी पूजा भट करणार दुसरं लग्न? म्हणाली...

नव्वदच्या दशकात आपल्या अभिनयासह बोल्डनेस आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिलेली अभिनेत्री म्हणजे पूजा भट्ट.  वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी बॉलीवूडमध्ये पदार्पण करत पूजानं अनेक सुपरहिट चित्रपट दिले. मिथून चक्रवर्ती यांच्यापासून ते शाहरुख खानपर्यंत प्रसिद्ध अभिनेत्यांबरोबर पूजा झळकली आहे. पूजाने आपल्या बोल्ड आणि हॉट अदांमुळे चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं होतं. आजही ५२ वर्षांची झाली असली तरी पूजा कायम चर्चेत असते. नुकतेच तिनं दुसऱ्या लग्नावर भाष्य केलं. 

पूजाचे चाहते तिला कायम कधी लग्न करणार आहे, असे अनेक प्रश्न विचारत असतात. अशातच आता पूजाने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर दिलं आहे. म्हणाली, 'सगळेजण मला तुझे लग्न कधी होणार आहे, तू सिंगल का आहेस, असे प्रश्न करत असतात. प्रत्येकवेळी नवीन व्यक्तीशी ओळख करुन देण्याचा प्रयत्न करतात. पण मी लग्न का करू?, मला आता लग्नाची गरज नाही. मी अविवाहितच चांगली आहे.  जर नशिबात कोणाला भेटणे लिहलं असेल तर ती व्यक्ती नक्कीच भेटेल'.

अभिनेत्री म्हणाली, 'लग्न जेव्हा व्हायचं तेव्हा होईल. एखाद्याला भेटण्याची गरज असते, तेव्हा तो सापडतो. फक्त एक माणूस सर्व गोष्टींवर उपाय नसतो. आपण सर्वांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. जीवनसाथी शोधण्यापेक्षा जोडीदार शोधणे चांगलं आहे. जर मला एक साथीदार मिळाला तर ती माझ्यासाठी सर्वोत्तम भेट असेल आणि जर मला तो मिळाला नाही तर मी माझे कुटुंब आणि माझे मित्र आनंदी आहेत'.

पूजा भट्टच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचं झालं तर तिनं केवळ 2 महिने डेट केल्यानंतर 2003 मध्ये मनीष माखिजासोबत लग्न केलं होतं. सुरुवातीला पूजा व मनीषची चांगली मैत्री झाली. मैत्रीनंतर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. पण पूजाचं हे नातंदेखील काही काळातच तुटलं. लग्नाच्या ११ वर्षांनंतर पूजाने मनीष मखीजाबरोबर घटस्फोट घेतला.
 

Web Title: Pooja Bhatt reacts to people asking her to get married