यामुळे पूजा बत्राने घेतला दुस-या लग्नाचा निर्णय, अशी आहे लव्हस्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 10:21 IST2019-07-15T10:21:17+5:302019-07-15T10:21:25+5:30
माजी मिस इंडिया आणि ‘विरासत’ फेम अभिनेत्री पूजा बत्रा हिने अभिनेता नवाब शाह याच्यासोबत सीक्रेट मॅरेज करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. सोशल मीडियावर पूजाच्या हातात लाल चुडा दिसला तेव्हा कुठे या लग्नाबद्दल सर्वांना कळले.

यामुळे पूजा बत्राने घेतला दुस-या लग्नाचा निर्णय, अशी आहे लव्हस्टोरी
ठळक मुद्दे42 वर्षांच्या पूजाचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी लॉस एंजिल्समधील एका बिझनेसमॅनसोबत तिचे लग्न झाले होते. मात्र 2011 मध्ये दोघांचाही घटस्फोट झाला होता.
माजी मिस इंडिया आणि ‘विरासत’ फेम अभिनेत्री पूजा बत्रा हिने अभिनेता नवाब शाह याच्यासोबत सीक्रेट मॅरेज करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. सोशल मीडियावर पूजाच्या हातात लाल चुडा दिसला तेव्हा कुठे या लग्नाबद्दल सर्वांना कळले. आता पूजा व नवाब एकमेकांच्या प्रेमात कसे पडले? पूजाने नवाब यालाच पार्टनर म्हणून का निवडले? या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. खुद्द पूजाने एका ताज्या मुलाखतीत याचा खुलासा केला.
सर्व अफवांना पूर्णविराम देत, पूजाने लग्नाची कबुली दिली. आम्ही गत 4 जुैला दिल्लीत आर्य पद्धतीने विवाह केला आणि यानंतर आठवडाभराने नोंदणी पद्धतीने विवाह केला, असे तिने सांगितले. या लग्नात आमचे अतिशय जवळचे लोक आणि मित्र तेवढेच हजर होते. आम्ही लग्नाचा निर्णय अचानक घेतला. कारण दीर्घकाळापासून तुम्ही लग्न का करत नाही, उशीर का करताय, असेच आम्हाला आमचे कुटुंबीय व मित्र ऐकवत होते. एकदिवस आम्हालाही आता लग्नाची वेळ आलीय, असे वाटले आणि आम्ही लग्नाचा निर्णय घेतला, असेही पूजाने सांगितले.
नवाबलाच पार्टनर म्हणून का निवडले, असे विचारले असता ती म्हणाली की, नवाबला भेटल्यानंतर हीच ती व्यक्ती आहे, जिच्यासोबत मी अख्खे आयुष्य घालवू शकते, असे मला वाटले. आमचे प्रोफेशन एक आहे, म्हणून आम्ही एकमेकांना ओळखत होतो. पण एका कॉमन फ्रेन्डने आमची भेट घडवून आणली. यावर्षी फेब्रुवारीत आम्ही भेटलो. या पहिल्याच भेटीत आमच्यातील अनेक गोष्टी समान असल्याचे आम्हाला जाणवले. एकमेकांशी न बोलताही आम्ही एकमेकांबद्दलच्या अनेक गोष्टी समजू शकतो. पहिल्या भेटीनंतर एकदिवस नवाब मला एअरपोर्टवर घ्यायला आला. खरे तर त्याचदिवशी तो मला प्रपोज करणार होता. पण तो इतका नर्व्हस झाला की, त्याने तो प्लान रद्द केला. यानंतर दिल्लीत त्याने मला प्रपोज केले. पुढे आमचे कुटुंब एकमेकांना भेटले.
42 वर्षांच्या पूजाचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी लॉस एंजिल्समधील एका बिझनेसमॅनसोबत तिचे लग्न झाले होते. मात्र 2011 मध्ये दोघांचाही घटस्फोट झाला होता. पूजा यावरही बोलली. तो माझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट काळ होता. दुसºया देशात या वाईट काळाला मी एकटीने तोंड दिले. त्या काळात मला मोठा धडा मिळाला. आयुष्य काळासोबत तुम्हाला अनेक गोष्टी शिकवते, असे ती म्हणाली.