"आंण्टी चप्पल तो उतार लो", त्यातही शॉर्ट ड्रेसमध्ये अभिनेत्रीने घेतले बाप्पाचे दर्शन पाहून चाहत्यांचा होतोय संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 17:32 IST2021-02-27T17:27:52+5:302021-02-27T17:32:52+5:30
तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हत्या, तर काहींनी इतक्या शॉर्ट ड्रेसमध्ये बाप्पाचे दर्शन घ्यायला नको हवे होते. अशा कमेंटस करताना दिसत आहे.

"आंण्टी चप्पल तो उतार लो", त्यातही शॉर्ट ड्रेसमध्ये अभिनेत्रीने घेतले बाप्पाचे दर्शन पाहून चाहत्यांचा होतोय संताप
फोटो काढण्यासाठी किती सेलिब्रेटीआटापिटा करतात हे आपल्या सा-यांनाच माहीत आहे. मात्र कधी कधी फोटो काढण्याच्या नादात भान विसरतात आणि नको त्या गोष्टी करुन बसतात. पूजा बत्रा अशाच एका फोटोमुळे चर्चेत आली आहे. सध्या ती गोवामध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. तिथल्या एका रिसॉर्टमध्ये पूजाने गणपती बाप्पाची मूर्ती पाहिली आणि बाप्पाच्या मूर्तीजवळ तिने फोटो काढला.
मात्र फोटो काढण्याच्या नादात चप्पलच काढायला विसरली. पूजाने शेअर केलेले फोटो पाहून चाहत्यांचा चांगलाच संताप होत आहे. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हत्या, तर काहींनी इतक्या शॉर्ट ड्रेसमध्ये बाप्पाचे दर्शन घ्यायला नको हवे होते. अशा कमेंटस करताना दिसत आहे. त्यामुळे पूजाने असे फोटो काढून चाहत्यांच्या भावना दुखावल्या आहेत.
1993 साली मिस इंटरनॅशनल सौंदर्य स्पर्धेत पूजाने भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यानंतर 1997 साली 'विश्वविधाता' चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर विरासत, भाई, हसीना मान जायेगी, कहीं प्यार ना हो जाये, नायक यासारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली होती. 2003 साली पूजाने लॉस अँजेलसमधील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सोनू अहलुवालियासोबत लग्न करत तिथेच स्थायिक झाली.
लग्नानंतप पूजा बॉलिवूडपासून लांब गेली आणि संसारात रमली. मात्र या दोघांचे लग्न फार काळ काही टिकले नाही. अखेर 2011 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला आणि वेगळे झाले. पूजा पुन्हा भारतात परतली आणि पुन्हा एकदा प्रेमात पडली. वयाच्या ४२ व्या वर्षी अभिनेता नवाब शाहसह पूजाने लग्न केल्याचे म्हटले जात आहे.पूजाचं हे दुसरं लग्न आहे.
नवाब म्हणाला की, त्याने जेव्हा पहिल्यांदा पूजाला एअरपोर्टवर पाहिले तेव्हाच त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. प्रेमाबद्दल बोलताना नवाब म्हणाला की, ‘हे अगदी सहज झालं. ती सात समुंदर पार लॉस एंजेलिसला होती.
आम्ही 20 वर्षांपूर्वी एकमेकांना ओळखत होतो. पण गोष्टी अचानक अशा बदलल्या की आम्हालाच कळलं नाही. पहिल्यांदा आम्ही लॉस एंजेलिसच्या एअरपोर्टवर भेटलो. एवढ्या वर्षांमध्ये आम्ही पहिल्यांदा भेटत होतो.’